गोरडवाडी गावचे चि. दादासाहेब हुलगे व रेडे गावच्या चि.सौ.कां. सुप्रिया काळे यांचा शुभविवाह थाटात संपन्न.

गणपतराव वाघमोडे, अर्जुनसिंह मोहिते पाटील, मामासाहेब पांढरे, ॲड. सोमनाथ वाघमोडे, बाळासाहेब कर्णवर, किशोर सुळ पाटील, गौतमआबा माने, माऊली पाटील, सचिनआप्पा वावरे, रमेश पाटील, बाळासाहेब सरगर आदी नेत्यांसह प्रशासकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती.

गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडी येथील श्री‌. साधू नारायण हुलगे यांचे द्वितीय चिरंजीव दादासाहेब व रेडे येथील श्री. संजय साहेबराव काळे यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां. सुप्रिया यांचा शुभविवाह रविवार दि. 7/11/2021 रोजी दुपारी 12.15 मिनिटांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोरडवाडी येथे मंगलमय वातावरणात थाटात संपन्न झाला.

यावेळी माळशिरसचे ज्येष्ठ नेते गणपतराव वाघमोडे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, श्री श्री सद्गुरु साखर कारखाना राजेवाडीचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, माळशिरसचे युवा उद्योजक सचिनआप्पा वावरे, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, नातेपुतेचे माजी सरपंच रावसाहेब पांढरे, नातेपुतेचे धुरंदर नेते दादासाहेब लाळगे, कचरेवाडीचे माजी उपसरपंच संजय तरडे, ॲड. प्रशांत रुपनवर, मुंबई म्हाडाचे कार्यकारी अभियंता भिमराव काळे, सातारा जिल्हा वनअधिकारी हरिशचंद्र वाघमोडे, उपजिल्हाधिकारी हरिश सुळ, सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता तोंडे, एपीआय सोमनाथ कर्णवर-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गोविंद कर्णवर-पाटील, विक्रीकर अधिकारी भारत गोफणे, पीएसआय विष्णू वाघमोडे, डॉ. समीर बंडगर, डॉ. दत्तात्रय सर्जे, ठोका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, मुख्याध्यापक हरी खरात, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष तायाप्पा गोरड, सरपंच विष्णु गोरड, माजी सरपंच लक्ष्मण गोरड, माजी सरपंच भागवत कर्णवर, युवा नेते मच्छींद्र गोरड, मच्छिंद्र कर्णवर, माजी चेअरमन संतोष गोरड, जगन्नाथ गोरड, प्रकाश जाधव, सरकारी वकील ॲड. सरगर, पत्रकार एल.डी.वाघमोडे, संजय हुलगे, आनंद शेंडगे सर, बारामती झटका न्यूज चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, यांच्यासह प्रशासकीय, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

या लग्न कार्यास जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर आणि पंचायत समिती सदस्य अजय सकट यांनी भेट दिली.हा लग्नसोहळा यशस्वी करण्यासाठी हनुमंत हुलगे, भगवान कोकरे, जगन्नाथ हुलगे, निलेश हुलगे, नवनाथ हुलगे, पै. शिवाजी हुलगे, अजिनाथ हुलगे, रणजित गोरड, शशिकांत कोकरे, आकाराम कोकरे यांनी अथक परिश्रम घेतले. या लग्न समारंभाचे निवेदन प्रा. शरद कर्णवर व श्रीनिवास कदम पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने मोदी सरकार विरोधात अनोख्या पद्धतीने भाऊबीज साजरी
Next articleमाळीनगरचे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गिरमे राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने सन्मानित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here