ज्योत अनंतात विलीन, स्मृतींनी दाटला कंठ…
भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही श्रध्दांजली…!
गोरडवाडी (बारामती झटका)
गोरडवाडी गावच्या कै. हौसाबाई केसु गोरड यांचे सोमवार, दि ३० मे २०२२ रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या लग्नानंतर काही वर्षातच त्यांच्या पतीचे ऐन तारुण्यात अकाली निधन झाले. त्यामुळे त्यांच्यासमोर खूप मोठे संकट उभे राहिले. त्यावेळी लहान असलेली तीन लेकरं कशी जगवायची, त्यांचे पालन पोषण कसे करायचे, असे विविध प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. पण त्यातून मार्ग काढत त्यांनी आपल्या संघर्षमय जीवनाला न खचता त्याला धिरोदत्तपणे तोंड दिले आणि संकटातूनच मार्ग काढत पुढे जायचे अशी खूणगाठ बांधली. त्यामुळे मोठ्या कष्टातून आपला संसार उभा केला.
हौसाबाई़नी आपल्या मुलाना चांगल्या संस्काराची शिदोरी देऊन घडवले. त्यांच्या पश्चात थोरला मुलगा पांडूरंग गोरड, मुलगी शेषाबाई हुलगे तर लहान मुलगा शंकर गोरड, थोरली सून माजी सरपंच बायडाबाई पांडूरंग गोरड, दुसरी सून सुरवंताबाई शंकर गोरड यांच्यासह हौसाबाई आजीना नातवांडे, परतांवडे, खापरतोंडे पाहण्याचा योग मिळाला. त्या धार्मिक व आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. तसेच शांत स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या जाण्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती ईश्वराने त्यांच्या परिवाराला द्यावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना…!
आजी तुझा हसरा चेहरा,
तुझ्या मनाचा तो भोळेपणा,
नाही दुखावलेस तू कधी कोणाला,
नाही केलास कधी तू मोठेपणा,
सोडून गेलीस तू अचानक,
येते खूप तुझी आठवण.
परत ये तू हीच अपेक्षा…
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना….

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng