गोरडवाडी ग्रामपंचायतच्या बिनविरोध सरपंचपदी विष्णूभाऊ गोरड यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब.
गोरडवाडी ( बारामती झटका )
गोरडवाडी ता. माळशिरस या ग्रामपंचायतीचे सर्वच्या सर्व सदस्य बिनविरोध ग्रामपंचायतमध्ये सर्व गावातील गट-तट विसरून एका ठिकाणी येऊन ग्रामपंचायत बिनविरोध केलेली होती. गोरडवाडी ग्रामपंचायतच्या सर्वानुमते सरपंचपदी बायडाबाई पांडुरंग गोरड व उपसरपंचपदी मैनाबाई दीपक गोरड यांची निवड करण्यात आलेली होती.
गोरडवाडी गावातील गोरड व हुलगे या दोन्हीही गटाचे पाच वर्षाचे सरपंच व उपसरपंच पदाच्या कालावधीचे नियोजन ठरलेले आहे. त्याप्रमाणे सरपंच बायडाबाई गोरड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला होता. रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक २४/०९/२०२१ रोजी सकाळी १० ते १२ नामनिर्देशन पत्र स्वीकारणे १२ ते १ नामनिर्देशन पत्राची छाननी, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ दुपारी १ ते २ सरपंच व उपसरपंच पदाची निवडणुकीची वेळ दुपारी २ वाजता असल्याचे अध्यासी अधिकारी तथा इस्लामपूरचे मंडळ अधिकारी चव्हाण भाऊसाहेब यांनी नोटिशीद्वारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी गोरडवाडी व माळशिरस पोलीस स्टेशन यांना निवडणुकीचा कार्यक्रम कळवलेला आहे.
सरपंच पदाची तारीख जाहीर होताच गोरडवाडी येथे नेतेमंडळी व पार्टी प्रमुख यांची बैठक होऊन सरपंच पदासाठी चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. त्यामध्ये युवा नेते विष्णूभाऊ गोरड यांची चिट्ठी निघालेली असल्याने गोरडवाडी गावच्या सरपंच पदी युवकाला पहिल्यांदा संधी मिळणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng