गोरडवाडी येथील सौ. अंजना शिवाजी गोरड यांचे दुःखद निधन…

राष्ट्रवादी किसान सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष मच्छिंद्र गोरड सर यांना मातृषोक

गोरडवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी येथील सौ. अंजना शिवाजी गोरड यांचे वयाच्या ६५ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने बुधवार दि. २२/३/२०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता दुःखद निधन झालेले आहे. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, चार मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी किसान सेलचे माळशिरस तालुका अध्यक्ष मच्छिंद्र गोरड सर यांच्या त्या मातोश्री होत्या.

सौ. अंजना गोरड यांना पंधरा वर्षांपूर्वी अर्धांगवायू झालेला होता. तेव्हापासून त्यांचे चिरंजीव मच्छिंद्र गोरड सर यांनी श्रावण बाळासारखी आईची सेवा केलेली होती‌. त्यांना गोरडवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्या सौ. पुनम मच्छिंद्र गोरड यांनी साथ देत सासूची चांगल्या पद्धतीने सेवा केली. सौ. अंजना धार्मिक वृत्तीच्या होत्या‌. त्यामुळे त्यांना सौभाग्य मरण आले. त्यांचा सुसंस्कृत स्वभाव होता‌. त्या सर्वांमध्ये मिळून मिसळून वागत असत‌. आज गुढीपाडव्याचा दिवस, या दिवशी सकाळी गुढी उभारलेली होती. सायंकाळी गुढी खाली घेत असताना त्यांनी आपला देह ठेवलेला आहे‌. आणि जगाचा अखेरचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्यावर म्हसवड ता. माळशिरस येथील गोरडवाडी येथे राहत्या घराशेजारील शेतामध्ये अंतिम संस्कार रात्री ९ वाजता करण्यात येणार आहे.

त्यांच्या दुःखद निधनाने गोरड परिवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे‌. मृतात्म्यास शांती लाभो व गोरड परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article
Next articleअकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सत्ताधारी मोहिते पाटील गट भाजप बुद्रुकला सामावून घेणार का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here