गोरडवाडी विकास सेवा सोसायटीची नाट्यमय घडामोडी नंतर बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली.

काका पुतण्याचे मोठे योगदान, गोरडवाडी ग्रामस्थांनी निर्णयाचे स्वागत करून केले अभिनंदन.

ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करून विकास सेवा सोसायटीची बिनविरोध निवडणूक करणारे आदर्शगाव गोरडवाडीतील बिरोबाभक्तांचा आदर्श घ्यावा.

गोरडवाडी ( बारामती झटका )

गोरडवाडी ता. माळशिरस येथील विविध कार्यकारी सोसायटीची बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली. सोसायटीची नाट्यमय घडामोडीनंतर बिनविरोध निवडणूक प्रक्रिया पार पडली असल्याचे सहाय्यक निबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी जी.बी. जाधव यांनी घोषीत केले आहे.

तुकाराम कृष्णा कळसुले व लाला विठ्ठल कळसुले यांनी मनाचा मोठेपणा करून सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी स्वत:चा उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. काका पुतण्यांचे गोरडवाडी विकास सेवा सोसायटी बिनविरोध करण्यामध्ये मोठे योगदान आहे. गोरडवाडी ग्रामस्थांनी काका-पुतण्याच्या निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन केले. कळसुले यांना उमेदवारी देण्यात आली होती. सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अडचण निर्माण झाली होती. त्यासाठी स्वत:चा उमेदवारी अर्ज माघारी घेऊन सोसायटीची निवडणूक काका-पुतण्यांनी बिनविरोध केलेली आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक करून वेगळा आदर्श निर्माण केलेला होता. विकाससेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध करणारे आदर्श गाव गोरडवाडीतील बिरोबा भक्तांचा आदर्श इतर गावातील लोकांनी घ्यावा असा आहे.

गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे तेरा सदस्य बिनविरोध झालेले आहेत. सर्वसाधारण कर्जदार गटात तुकाराम ज्ञानोबा गोरड, शामराव नाना हुलगे, सोमनाथ साधू कोकरे, भारत गुलाब गोरड, लक्ष्मण जगन्नाथ गोरड, येदु श्रीमंत गोरड, दत्‍तू रामा कोळेकर, सुरेश तात्या गोरड तर महिला प्रतिनिधी गटात बाळाबाई विष्णू यमगर, चंद्राबाई माणिक पिंगळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात मच्छिंद्र माणिकराव कर्णवर, अनुसूचित जाती जमाती गटात दादा बाबा वायदंडे, इतर मागास प्रवर्ग गटात सुनील लक्ष्मण पोरे असे बिनविरोध सदस्य झालेले आहेत.

गोरडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणुक बिनविरोध करण्यात भिकाजी गोरड, नानासाहेब हुलगे, यशवंत गोरड, बाळासाहेब कर्णवर, लक्ष्मण गोरड, बापू गोरड, शंकर यमगर, हनुमंत गोरड, विजय गोरड, बाळासाहेब गोरड, कांतीलाल लवटे, पांडुरंग पिसे, विष्णूभाऊ गोरड, रामा गोरड, अजित कर्णवर, धुळा गोरड आदी मान्यवरांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleAlien Wars Gold USD AWG-USD Cryptocurrency Forum & Discussion
Next articleमंदिर, मस्जिद व भोंग्याचे राजकारण काही लोकांच्या स्वतःच्या स्वार्थासाठी असून महाराष्ट्रातील जनतेने या गोष्टींना साथ देऊ नये, रविकांत वरपे यांचे जनतेला आवाहन …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here