गोवा राज्याचे प्रभारी तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनात भाजपचे सरकार निश्चित येईल आमदार राम सातपुते.
गोवा ( बारामती झटका )
गोवा राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे गोवा राज्याचे विधानसभा प्रभारी तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली गोवा राज्यांमध्ये भाजपचे सरकार निश्चित येईल असा आत्मविश्वास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी गोवा राज्याचा दौरा करून आल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

गोवा राज्यातील महत्त्वाची व संवेदनशील असणारी म्हापसा विधानसभेची प्रभारी जबाबदारी लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्याकडे सुपूर्त केली आहे. आमदार राम सातपुते यांनी म्हापसा विधानसभा मतदार संघात प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन मतदारसंघाचा दौरा केलेला आहे.

गोवा राज्यातील अनेक प्रमुखांशी चर्चा करून आगामी निवडणुकीची रणनीती आखलेली आहे. गोवा राज्याचे प्रभारी देवेंद्रजी फडवणीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे सरकार निश्चित येणार असल्याचा आत्मविश्वास आमदार राम सातपुते यांनी म्हापसा मतदारसंघासह गोवा राज्याचा दौरा केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng