गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीत भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, आमदार राम सातपुते यांची निवड

गोवा (बारामती झटका)

गोवा राज्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही येत्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात सुरु होणार आहे. त्यासाठी तेथील वेगवेगळ्या मतदारसंघासाठी प्रचार समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीत भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीत प्रभारी आहेत. त्यांनी या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्रातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची फळी तयार केली असून त्यांची बैठक घेतली आहे. त्यातून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तेथे मदत व्हावी व पक्षाची सत्ता पुन्हा यावी यासाठी विविध नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे आमदार, पदाधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाच्या संदर्भात निवडणूक प्रचार प्रक्रियेत सहभाग राहणार असल्याने ही निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीतील प्रचारसमितीची ऑनलाईन बैठक महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते व गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली. या बैठकीस महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मान्यवर उपस्थित होते.

आमदार राम सातपुते हे विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी वेळोवेळी घेत असलेल्या चांगल्या आणि आक्रमक भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. आमदार राम सातपुते यांना असंख्य तरुण एक आदर्श म्हणून बघतात. त्यांच्या कामाची पद्धत आणि नेतृत्वशैलीच्या जोरावर आमदार राम सातपुते हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. संघटन कौशल्य, माळशिरस विधानसभा निवडणूक, माळशिरस मतदार संघातील काम आणि भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून देशभर केलेला प्रवास, तेथील कामाचा व अनुभवाचा गोवा निवडणुकीमधील उमेदवारांना देखील लाभ व्हावा या हेतूने ही निवड करण्यात आली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना आता बिगर कृषी पदविधर व इतर सर्व ग्रामसेवकांना सामावून घेणार – राज्याध्यक्ष श्री. नितीन धामणे
Next articleडॉ. राजेंद्र मगर यांना दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार जाहीर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here