निरा नरसिंहपूर (बारामती झटका)
प्रमोद सावंत यांनी आज गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथ घेतली. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये हा शपथविधी कार्यक्रम झाला. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि प्रमुख मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत गोवा विधानसभेच्या प्रचारात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेक ठिकाणी भाषणे केली व नागरिकांशी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले घवघवीत यश हे पुढील निवडणुकीसाठी नांदी ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng