गौतमआबा माने यांनी नाद केला तर पुराच केला, वाया नाही गेला, सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व.

मोहिते पाटील समर्थकांचा सुपडा साफ, सोसायटीच्या निवडणुकीत उडवला धुरळा…

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक रामदास माने यांचा पत्नीसह दारुण पराभव.

कण्हेर ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे सदस्य पश्चिम भागाचे नेते गौतम आबा माने यांनी सोसायटीच्या निवडणुकीत नाद केला तर पुराच केला, वाया नाही गेला‌. सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळविलेले आहे. मोहिते पाटील समर्थकांचा सुपडा साफ करून सोसायटीच्या निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवून दिलेला आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ माने यांचा पत्नीसह दारूण पराभव झालेला आहे.
कण्हेर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात 1927 साली स्थापन झालेली आहे. पहिल्यांदाच सोसायटीची निवडणूक लागलेली होती.

कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनल गौतमआबा माने यांच्या मार्गदर्शनाखाली तर कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनल माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, विविध संघटनांचे अध्यक्ष असणारे मोहिते पाटील समर्थक यांच्या मार्गदर्शनाखाली असे दोन पॅनल समोरासमोर उभे होते. गौतमआबा गटाचे अर्जुन दत्तात्रय कुंभार बिनविरोध झालेले होते. उर्वरित बारा उमेदवार निर्विवाद वर्चस्व मिळवून विजयी झालेले आहेत. विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत 317 मतदारांपैकी 302 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे सर्व साधारण खातेदार कर्जदार गटामध्ये दुधाळ दशरथ सिदु 114 ,काळे बलभिम विठ्ठल 104, माने बापू शंकर 109, माने दादासो सखाराम 98, माने धनाजी लक्ष्मण 108, माने धनाजी पोपट 138, माने रामदास शंकर 100, पाटील तुकाराम भगवान 118 तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे चव्हाण तात्याबा जगू 152, काळे कैलास नाना 155, खताळ नामदेव मल्हारी 144, माने बाजीराव महादेव 165, माने ब्रह्मदेव यशवंत 157, माने महादेव रामचंद्र 157, माने शिवाजी विठ्ठल 165, शेंडगे दगडू अनंता 145 अशी उमेदवारनिहाय मते पडलेली आहेत.
कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे अनुसूचित जाती जमाती गटामध्ये केंगार नामदेव आबाजी 128, तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे मिसाळ अंबादास केसू 167 मते पडलेली आहेत. सर्वात जास्त मते देवकाते अनिता बापू या महिला प्रतिनिधी उमेदवार यांना पडलेली आहेत. त्यांनी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामभाऊ माने यांच्या धर्मपत्नी माने रुक्मिणी रामभाऊ यांचा पराभव केलेला आहे.

कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे महिला प्रतिनिधी गटात देवकर लिलावती सोपान 104, माने रूक्मिणी रामदास 119 तर गणेश सिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलच्या देवकाते अनिता बापू 193, ढगे सविता मच्छिंद्र 163 महिला प्रतिनिधी यांना मते पडलेली आहेत. कण्हेरसिद्ध शेतकरी विकास पॅनलचे भ.ज.वि.जा‌. विमाप्र गटामध्ये काळे मोहन मुरलीधर 114 तर कण्हेरसिद्ध परिवर्तन सहकार विकास पॅनलचे वाघमोडे विठ्ठल पांडुरंग 182 अशी मते आहेत.

अकलूज सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अविनाश कांबळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांना सहकार्य सोसायटीचे सचिव विजय कुलकर्णी यांनी केले. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी विजयी उमेदवारांची घोषणा करताच उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. सर्व पॅनल प्रमुख व विजयी उमेदवार, उत्साही कार्यकर्ते व मतदार यांच्यासमवेत ग्रामदैवत कण्हेरसिद्धच्या दर्शनाला वाजत गाजत गेले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतरंगफळ विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम
Next articleवेळापूरच्या जागेत कोणतीही मस्जिद, मदरसा अगर धार्मिक स्थळ बांधणार नाही – मन्सूर शेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here