चांगल्या रस्त्याला गतिरोधक, तसेच समाजामध्ये क्षेत्र कोणतेही असो जनमाणसात विरोधक असतातच.
माळशिरस ( बारामती झटका )
जगाची एकविसाव्या शतकाकडे वाटचाल सुरू असताना काळानुसार प्रसार माध्यमांनी डिजिटल मिडीया सुरू केलेले आहे. शहरी भागामध्ये डिजिटल मीडियाचे प्रस्त असताना ग्रामीण भागातील बारामती झटका यूट्यूब चॅनल यांनी गेल्या अडीच वर्षापासून सुरू केलेल्या चॅनलच्या एका बातमीस 20 लाख 60 हजार ( वीस लाख साठ हजार ) प्रेक्षकांनी बातमी पाहण्यास पसंती दिलेली आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक तसेच समाजामध्ये क्षेत्र कोणतेही असो जनमाणसात विरोधक असतातच. तरीसुद्धा बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी डिजिटल मीडियामध्ये गगन भरारी घेतलेली आहे.
श्रीनिवास कदम पाटील मु. पो. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर, महाराष्ट्र राज्य यांनी 2008 साली पाक्षीक साळुबाई वार्तापत्र सुरू केलेले होते. ते कमी कालावधीतच लोकप्रिय ठरलेले होते. पंधरा दिवसाचा अवधी ज्यादा वाटत असल्याने लोकांच्या आग्रहास्तव आठ दिवसातून प्रकाशित होणारे साप्ताहिक बारामती झटका २०१० साली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शुभहस्ते अंकाचे प्रकाशन करून सुरू केले. ते देखील वाचकांच्या पसंतीस अग्रगण्य ठरले. लोकांच्या व वाचकांच्या मनामध्ये असणाऱ्या बातम्या साप्ताहिकामध्ये प्रकाशित करण्यात येत होत्या. बदलत्या काळानुसार प्रसार माध्यमांमध्ये बदल झाले. अँड्रॉइड मोबाईलमुळे फेसबूक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, टेलिग्राम यामुळे डिजिटल जमाना सुरू झाला. ताज्या घटना मोबाईलवरती अपडेट होऊ लागल्या. त्यामुळे बारामती झटका वेब पोर्टल सुरु केले. वास्तववादी व परखडता यामुळे वेबपोर्टल देखील अल्पावधीतच सर्वदूर पसरले. ‘दिसलं तेच छापले’, कोणाच्या विरोधात अथवा कोणाच्या समर्थनार्थ बातमी प्रकाशित न केल्याने सर्वसामान्य जनतेमध्ये वेब पोर्टलला प्रचंड वाचकांची संख्या झालेली आहे. आज बारामती झटका वेबपोर्टल पाहणाऱ्या वाचकांची संख्या दीड कोटी वर गेलेली आहे. वेब पोर्टलची लोकप्रियता पाहता युट्युब चॅनेल सुरू केले. चॅनेलचे पहिले सबस्क्रायबर युवा उद्योजक सुजयसिंह माने पाटील हे आहेत. आज सबस्क्रायबर थेट सभासद झालेल्या लोकांची संख्या 37 हजार झालेली आहे. यूट्यूब चॅनेलने राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक याबरोबर क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देऊन अनादिकालापासून चालत आलेल्या कुस्ती क्षेत्रातही बारामती झटका यूट्यूब चॅनलने लोकप्रियता मिळवलेली आहे. गत दोन वर्षांपूर्वी श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त गावाच्यावतीने भव्य जंगी कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये उद्घाटनाची कुस्ती त्रिमूर्ती केसरी वस्ताद प्रतापराव संजय यांचे चिरंजीव मेडद गावचे सुपुत्र साईराज झंजे व उद्धट येथील नलवडे यांच्यामध्ये झालेली होती. कुस्ती प्रेक्षणीय होऊन साईराज झंजे यांनी दैदिप्यमान विजय मिळविला होता. सदरची कुस्ती बारामती झटका यूट्यूब चॅनल वरती प्रसारित केलेली होती. ती बातमी पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 20 लाख 60 हजार ( 2,6 M ) एवढी झालेली आहे.
पक्षीक साळुबाई वार्तापत्र, साप्ताहिक बारामती झटका, बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनल चालवीत असताना योग्य बातमी असेल तीच प्रसारित केलेली आहे. आजपर्यंत कोणाच्या सांगण्यावरून बातमी प्रसारित केलेली नाही अथवा प्रसारित करण्याचे थांबवलेले नाही. त्यामुळे बारामती झटका वेबपोर्टल आणि यूट्यूब चॅनलने समाजामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. कोण काय म्हणते, यापेक्षा आपणास काय वाटते, तेच प्रेक्षक व वाचकांच्या समोर मांडलेले आहे. सध्या वेब पोर्टल व युट्यूब चैनल गुगलच्या जाहिरातींवर चालते. चांगल्या रस्त्याला जसे गतिरोधक असतात, तसेच क्षेत्र कोणतेही असो जन माणसांमध्ये विरोधक असतात. लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष न देता आजपर्यंतची वाटचाल सुरू आहे आणि इथून पुढेही अशीच सुरू राहणार आहे. आजपर्यंत वाचक, प्रेक्षक, हितचिंतक, जाहिरातदार यांचे बारामती झटका परिवार यांचेकडून अंतकरण पूर्वक आभार मानण्यात येत आहे. अशीच आपली वरचेवर साथ मिळावी अशी अपेक्षा बारामती झटका वेबपोर्टल आणि युट्युब चॅनेलच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng