Uncategorizedताज्या बातम्यामनोरंजन

‘ग्लोबल आडगाव’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाची अमेरिकेत निवड

सोलापूर (बारामती झटका)

सिल्वर ओक फिल्म्स व इंटरटेनमेंट प्रस्तुत, राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कार प्राप्त विजेते उद्योजक मनोज कदम निर्मित, अमृत मराठे सहनिर्मित आणि अनिलकुमार साळवे लिखित व दिग्दर्शित “ग्लोबल आडगाव” या मराठी चित्रपटाची निवड अमेरिकेतील न्युजर्सी मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाली आहे.

“ग्लोबल आडगाव” हा मराठीतील एकमेव असा चित्रपट ठरला आहे कि, या चित्रपटाची सकारात्मक दखल जगभर घेतली जात आहे. हा चित्रपट कोलकत्ता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील नामांकित लोकांनी पाहिला आणि उदंड प्रतिसाद दिला. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अनुराग बसू, कांतारा चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक निरीक्षित देव तर परीक्षक साजीयन कडोनी यांनी चित्रपटाची बांधणी, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, तंत्रशुद्ध बांधणी आणि दिग्दर्शनाचे प्रचंड कौतुक केले. अमेरिकेत होणाऱ्या न्युजर्सी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मराठी) येथे “ग्लोबल आडगाव” हा मराठी चित्रपट दाखविला जाणार आहे. या वेळी हॉलीवूड, बॉलीवूड मधील नामांकित दिग्दर्शक आपली हजेरी लावणार आहेत. मराठीचे संगीत, संस्कृती आणि उद्दिष्टे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित व्हावेत या उद्देशाने हा महोत्सव घेतला जातो. नवीन वर्षात जानेवारी महिन्या दरम्यान बिग सिनेमा, 1655 ओक थ्री रोड एडिसन, न्यु जर्सी 08820, युनायटेड स्टेट येथे होणार आहे. दिग्दर्शक अनिलकुमार साळवे यांना त्यांच्या लघुपटास अनेक पुरस्कार मिळालेले असून यशानंतर सिल्व्हर ओक फिल्म्स अँड इंटरटेनमेंट प्रस्तुत तर राष्ट्रीय उद्योजकता व इतर २१ पेक्षा जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त, वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, निर्माते मनोज कदम निर्मित तसेच अमृत मराठे सहनिर्मित “ग्लोबल आडगाव” हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला आहे. “ग्लोबल आडगाव” चित्रपटाचे दोन प्रिव्हू पुणे व मुंबईत झाले, समिक्षकांनी भरभरुन तारीफ केली. शेतकरी पुत्र या नात्याने या चित्रपटात शेती मातीत राबणाऱ्या हातांचा समृद्ध संघर्ष आहे. उत्कंठावर्धक कथासूत्र, उपहासात्मक, मर्मभेदी संवाद, ग्रामीण माणसांच्या सजीव करणाऱ्या व्यक्तीरेखा, गावजीवनाचं भव्य उदात्त चित्रीकरण या चित्रपटात केले आहे. मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील अस्सल भाषा, म्हणी, नैसर्गिक विनोद याने खुलणारे प्रसंग व आदर्श शिंदे, गणेश चंदनशिवे व जसराज जोशी यांनी गायलेल्या व विनायक पवार, प्रशांत मडपुवार, अनिलकुमार साळवे यांनी लिहीलेल्या गाण्यांना समिक्षकांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. “ग्लोबल आडगाव” म्हणजे शेती मातीतल्या पिढ्यांची जीवधरणी घुसमट सिनेमातून मांडली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांना लहाणापासून थोरांपर्यंत थिएटरमध्ये सर्वांनी एकत्र बसून पहावा असा चित्रपट आहे. एक तगडा संघर्ष, सुंदर प्रेमकहाणी, निखळ विनोद आणि बेरकी व्यवस्थेच्या भिंतीना तडा देणारा, मनोरंजनातून समाज प्रबोधन करणारा क्रांतीचा संघर्ष म्हणजेच ‘ग्लोबल आडगाव’ आहे. या सर्व गुणांमुळे आणि तांत्रिक बाबी लक्षात घेता ह्या सिनेमाचे प्रत्येक मोठ्या फेस्टिवलमध्ये जोरदार कौतुक होत आहे.

या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, उषा नाडकर्णी, अनिल नगरकर, उपेन्द्र लिमये, फुलचंद नागटिळक, रोनक लांडगे, अशोक कालगुडे, सिद्धी काळे, महेंद्र खिल्लारे, अनिल राठोड, संजीवनी दिपके, साहेबराव पाटील, शिवकांता सुतार, विष्णु भारती, ऋषिकेश आव्हाड, परमेश्वर कोकाटे, वैदेही कदम, आदित्य केरे, अनिल गायकवाड, अभिजीत मोरे, विष्णु चौधरी, रामनाथ कातोरे, विक्रम त्रिभुवन यांच्या मुख्य भूमिका आहेत. इ.पी. प्रशांत जठार, प्रोडक्शन व्यवस्थापक सागर देशमुख, छायांकन गिरीश जांभळीकर, संगीत विजय गवंडे, साउंड विकास खंदारे, आर्ट संदिप इनामके, संकलन श्रीकांत चौधरी, डिआय दिशा रंगालय, मेकअप मंगेश गायकवाड यांचे असून डॉ. सिद्धार्थ तायडे, प्रतिपदा सोळंके, दिलीप वाघ, गणेश डुकरे, वैदेही कदम, स्नेहल कदम, गणेश लोहार, मंगेश तुसे, संतोष गोरे, यशपाल गुमलाडू, मधुकर कर्डक, प्रियांका सदावर्ते, प्रेरणा खरात, अनिल गायकवाड, सोमनाथ मराठे, प्राजक्ता खिस्ते, जगदिश गोल्हार, सुशील डायगव्हाणे, जितेंद्र सिरसाट, प्रभात तालखेडकर, अनुराधा प्रकाश, राहुल कांबळे, अक्षय गायकवाड, मनिष खंदारे, सचिन गेवराईकर, स्वप्नील खरात, अमृता मोरे, मयंक सिरसाठ, केरे महाराज, आदित्य, प्रतिक्षा गोरे, अरुण गाडे, अभिजीत काटे, भगवान राउत, रुपेश पासफुल, ज्ञानेश्वर हरीमकर, डॉ. सतिश म्हस्के, प्रेरणा खरात, विद्या जोशी, रानबा गायकवाड, सागर पतंगे, व्यंकटेश कदम, अभिजीत कदम, नानासाहेब कर्डीले, रोहिदास मोरे, प्रकाश रणधीर, सोनल मर्चंडे, सुधीर श्रीराम, स्वप्नील काळे, डॉ. ज्ञानेश्वरी उंडणगावकर, राजेश वाठोरे, योगेश लम्हने, सचिन कुलकर्णी, युवराज साळवे, सुदर्शन कदम, अरविंद हमदापूरकर, अमोल पानबुडे, प्रकाश जावळे, प्रशांत जाधव, चैताली जाधव, अकांक्षा हमदापूरकर, साई महाशब्दे, आशीर्वाद नवघरे यांच्या भूमीका आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

4 Comments

  1. Generally I don’t read article on blogs, however I would like to say that this write-up
    very forced me to take a look at and do it!
    Your writing style has been amazed me. Thank you, very nice article.

    I saw similar here: Sklep

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort