Uncategorizedताज्या बातम्याशैक्षणिक

ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमधील मृणाल महेशकुमार मोरेची इस्रो येथे विज्ञान अभ्यास दौऱ्यासाठी निवड

नातेपुते (बारामती झटका)

ग्रामीण भागातील विदयार्थ्यांमध्ये संशोधनाची रुची निर्माण व्हावी तसेच, ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान व संशोधन संस्था बघता याव्यात, यासाठी मागील वर्षी नोबेल फाऊंडेशन आणि भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन जळगाव द्वारा राज्यस्तरीय नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा संपन्न झालेली होती. या परीक्षेच्या मुलाखतीचा अंतिम निकाल दि. १६ जानेवारी रोजी संध्याकाळी जाहीर करण्यात आला. राज्यभरातून बसलेल्या विदयार्थ्यामधून अंतिम ६१ जणांची निवड करण्यात आली. यात सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने तर राज्य स्तरावरून १४ वा क्रमांकाने ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची मधील मृणाल मोरे ई. ७ वी हिची निवड झाली आहे.

या अभ्यास दौऱ्यात ईस्त्रो स्पेस लॅब, आयआयटी, प्लाजमा अनुसंधान संस्था व इतर विज्ञान अभ्यासक्रम संदर्भात संस्थांना भेट देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थी विज्ञान मंथन NCERT, दिल्ली यांनी आयोजित केलेल्या National level science exam मध्येही तिचा सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच या परिक्षेत मौर्य निटवे यानेही सहभाग नोंदविला. या दोघांचा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची चे चेअरमन डॉ. दत्तात्रय निटवे सर, सचिव डॉ. योगिता निटवे मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर, उपप्राचार्य जिलानी आतार सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort