‘घार फिरते आकाशी, तिचे लक्ष पिल्लापाशी’ अशी अवस्था माळशिरस विधानसभेचे आमदार राम सातपुते यांची आहे.

माळशिरस शासकीय विश्रामगृहात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा जनता दरबार भरत आहे.

माळशिरस ( बारामती झटका )

पक्षांमध्ये घार पक्षी आकाशामध्ये उंच झेप घेत असतो. मात्र, आकाशामध्ये कितीही उंच फिरत असली तरीसुद्धा तिचे लक्ष पिलापाशी असते‌. अशीच अवस्था माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची झालेली आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात आमदार राम सातपुते यांच्या रूपाने पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून माळशिरस तालुक्याला भाग्य लाभलेले आहे. आमदार राम सातपुते माळशिरस तालुक्यामध्ये नेहमी अडीअडचणीच्या काळातसर्वसामान्य माणूस व शेतकरी यांच्यासोबत राहिलेले आहेत. अनेकवेळा जनतेच्या हितासाठी व शेतकऱ्यांसाठी भर रस्त्यावर उतरून उन्हात आंदोलने केलेली आहेत. तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट अशा वेळी नुकसानग्रस्त गावांना भेटी देऊन शेतकऱ्याच्या बांधावर गेले आहेत. अधिकाऱ्यांना पंचनामे व नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा असतो. अनेक तरुण सर्वसामान्य, शेतमजूर, कष्टकरी हे आमदार राम सातपुते यांना थेट फोन करून अडचणी सोडवून घेत असतात.

माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध होऊन कोणत्याही व्यक्तीचा फोन उचलणारे आमदार म्हणून ख्याती झाली होती. भारतीय जनता पार्टीने आमदार राम सातपुते यांच्यावर भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यामुळे इतर बाहेरच्या राज्यामध्ये युवा मोर्चाच्या कार्यक्रमामुळे जावे लागत आहे, तरीसुद्धा थेट फोन वरून जनतेचा संपर्क आहे. बाहेर राज्यातून सुद्धा मतदारसंघाकडे लक्ष असल्याने घार फिरे आकाशी जसे तिचे लक्ष पिल्लापशी असते, असेच लोकप्रिय आमदार राम सातपुते यांचे झालेले आहे. युवा मोर्चाच्या कामानिमित्त बाहेरच्या राज्यात जरी असले तरीसुद्धा मतदारसंघातील जनतेच्या अडचणी व प्रश्नाकडे लक्ष आहे. मतदारसंघात आल्यानंतर शासकीय विश्रामगृह माळशिरस येथे मतदारसंघातील अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दिवसभर ठाण मांडून होते. जनता दरबार भरावा अशा प्रकारे लोकं आमदाराकडे कामे घेऊन येत आहेत. आमदार राम सातपुते थेट अधिकारी यांना फोन करून काम मार्गी लावत आहेत. अनेक प्रश्न आमदार राम सातपुते यांचे विश्वासू सहकारी हरीभाऊ पालवे कागदपत्रांची पूर्तता करून शासकीय कार्यालयातील काम मार्गी लावत आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील जनतेला थेट आमदाराचा संपर्क होत आहे. अनेक लोक काम झाले म्हणून आमदारांना सांगण्यासाठी येत आहेत. दिवसेंदिवस आमदारांची कार्यामधून लोकप्रियता वाढत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजनांचे पालन करावे – अंकिता हर्षवर्धन पाटील
Next article“ते पत्र म्हणजे सरकारचा निर्णय नव्हे”, एकरकमी FRP बाबतच्या पियुष गोयल यांच्या पत्रावर “स्वाभिमानी” ची भुमिका..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here