माळशिरस (बारामती झटका)
पाटील वस्ती ता. माळशिरस येथे चंद्रभागा जिरेनियम डिस्टिलेशन प्लॅन्टचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शनिवार दि. २ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ९ वा. पुणे पंढरपूर रोड, ६० फाटा, पाटील वस्ती, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी नगरसेवक, सरपंच, उद्योजक, शेतकरी, अधिकारी, मित्र परिवार, नातेवाईक व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दादासाहेब काळे आणि निलेश काळे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
औषधी सुगंधी वनस्पती, बिगर हंगामी (बारमाही लागवड करता येते), सर्व प्रकारची जमीन लागवडीसाठी योग्य, सामान्य पिकांपेक्षा कमी पाण्याची गरज, सेंद्रिय रासायनिक पद्धतीने पीक उत्पादन घेता येते, एकदा लागवडीनंतर सुमारे ३ ते ४ वर्षांपर्यंत उत्पादन घेता येते, वार्षिक सरासरी ३ ते ४ वेळा पिकाची कापणी करता येते, प्रत्येक कापणीमध्ये १० ते १६ टन पाल्याचे उत्पादन, १ टन पाल्यापासून सरासरी ८०० ते १२०० मिलि पर्यंत तेल मिळते, तेलाचा भाव ११,०००/- ते १२,५००/- प्रति कि. हमी भावाने, एकरी ८ ते ९ हजार रोपे लागतात, लागवड सरासरी पद्धत ४×१.२५ फूट, एकरी निव्वळ नफा वार्षिक २ ते ३ लाख (सर्व खर्च वजा जाता) अशा पद्धतीने पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन पीक म्हणजेच जिरेनियमची लागवड करून चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेता येते.

तसेच जिरेनियम लागवड, पीक कापणी व तेल गाळप हे सर्व या ठिकाणी पाहता येणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक संपर्कासाठी दादासाहेब अण्णा काळे मो. ९७३०१०४५४०, ८८३०४२३९२९, ८७२२९६०२६३
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
