ग्रामीण भागातील गावाकडे घडणाऱ्या दैनंदिन करामती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या कलाकारांचे बारामती झटका यांचेकडून अभिनंदन.
कांबळेश्वर ( बारामती झटका )
कांबळेश्वर ता. बारामती येथील भरत शिंदे उर्फ बाळासाहेब, पत्रकार रामदास जगताप उर्फ रामभाऊ, सुभाष मदने उर्फ तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाषराव यांच्यासह ग्रामीण भागातील कलाकाराने गावाकडे घडणाऱ्या करामती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणाऱ्या चांडाळ चौकटी च्या करामती कलाकारांनी प्रेक्षकांना हसवत ठेवत वेब सिरीजच्या शतकाकडे वाटचाल केलेली असल्याने बाळासाहेब, रामभाऊ व सुभाषराव यांचा सन्मान माळशिरस तालुक्यातील लवंग गावचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनोद भोसले व बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी कांबळेश्वर येथील कलाकारांच्या निवासस्थानी जाऊन कलाकारांचे कौतुक करून पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या झाडाचे रोप देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

कांबळेश्वर येथील ग्रामीण भागातील कलाकारांनी गेल्या दोन वर्षापूर्वी चांडाळ चौकटीच्या करामती वेब सिरीजची निर्मिती केलेली होती. गावाकडच्या घडणाऱ्या दररोजच्या करामती नैसर्गिकरित्या लोकांसमोर आणल्या जात होत्या. जगाच्या कानाकोपऱ्यात उद्योग व्यवसाय व नोकरी निमित्त राहत असणाऱ्या लोकांना आपल्या परिसरातील, भागातील, गावाकडील कलाकारांचे कौतुक वाटत व ते आवडीने पाहत असत. मालिका गंमतशीर असल्याने फुलत गेली. 100 आठवडे महाराष्ट्रासह जगाच्या कानाकोपऱ्यात वेब सिरीज लोकप्रिय झालेली आहे. गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत तब्बल 31 कोटी व्हुज आणि 13 लाखाहून अधिक सबस्क्राईब्स मिळालेले आहेत. वेब सिरीजच्या माध्यमातून समाजामध्ये चालू असणाऱ्या घडामोडी यावर त्यांनी वेब सिरीजमध्ये समावेश केलेले आहे. माणूस कितीही दुःखी असला अडचणीत असला तरीसुद्धा चांडाळ चौकडीच्या करामती पाहिल्यानंतर समाजामध्ये रडण्यापेक्षा हसवायला जास्त लावणारे कलाकारांचे कलागुण जनतेने पाहिलेले आहे.

चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज फौजिया एपिसोडचे कलाकार भरत शिंदे, रामदास जगताप, सुभाष मदने, सुदाम नेवसे, विष्णू भारती, संजय खलाटे, तुषार घोरपडे, अमीर अहिवळे, उज्जैन पवार, विशाल वाघमारे, प्रणव मदने, किरण खलाटे, गणेश लोणकर, रोशन मुळीक, रेणुका पिसे, गौरी कुंभार हे कलाकार प्रमुख भूमिका साकारताहेत. दिवसेंदिवस कलाकारांची व्याप्ती वाढत चाललेले आहे. अशा ग्रामीण भागातील कलाकारांचे गोड कौतुक करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते विनोद भोसले व बारामती झटका वेब पोर्टल आणि यूट्यूब चैनल चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी कांबळेश्वर येथे कलाकारांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन कलाकारांना शुभेच्छा दिल्या. कलाकारांनीही मनसोक्त गप्पा मारून आदरातिथ्य केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
