पालकमंत्री दत्तामामा भरणे, जिल्हा नियोजन समिती सदस्य उत्तमराव जानकर, पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
फडतरी ( बारामती झटका)
फडतरी गावचे सुपुत्र युवा नेतृत्व युवा उद्योजक चिरंजीव संजय आनंदराव रुपनवर पाटील यांच्या (वाढदिवस) अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त चांडाळ चौकडीच्या करामती यामधील बाळासाहेब नावाने सर्व परिचित असणारे ह.भ.प. भरत शिंदे महाराज यांचे समाज प्रबोधनपर सुश्राव्य किर्तन बुधवार दि. ०१/०६/२०२२ रोजी सायंकाळी ७.०० वा. ग्रामपंचायत कार्यालय फडतरी येथे होणार आहे.
अभिष्टचिंतन सोहळा व किर्तन सोहळ्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तामामा भरणे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने आदींसह तालुक्यातील, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक, कला आणि क्रीडा क्षेत्रासह पुणे येथील उद्योजक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.

फडतरी सारख्या ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन कार्यकर्तृत्वाच्या जोरावर पुणे येथे उद्योग व्यवसायात गगन भरारी घेऊन ग्रामीण भागाशी जोडलेली नाळ न तोडता चिरंजीव संजय रुपनवर पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोगी व प्रबोधन करणारे विनोदाचा बादशहा असणारे ह.भ.प. भरत शिंदे महाराज उर्फ चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून समाजासमोर वेगळा आदर्श ठेवलेला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे फडतरी पंचक्रोशीमध्ये कौतुक केले जात आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng