माळशिरस ( बारामती झटका )

ओंकार साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड चांदापुरी ता. माळशिरस या साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव दादासाहेब बोत्रे पाटील व जनरल मॅनेजर भीमराव राजाराम वाघमोडे यांनी प्रति टन 2550/- (पंचवीसशे पन्नास) यंदाच्या गळीत हंगामासाठी दर जाहीर केलेला असल्याने एफआरपीपेक्षा 350/- रुपये ज्यादा दर जाहीर केलेला असल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होणार आहे.ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन व जनरल सेक्रेटरी यांनी यंदाच्या 2021 – 2022 गळीत हंगामासाठी प्रति टन पंचवीसशे पन्नास रुपये दर जाहीर केलेला असून दोन हप्त्यांमध्ये देण्याचे कारखान्याचे संचालक मंडळाच्यावतीने जाहीर करण्यात आले आहे.

तरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याकडे जास्तीत जास्त ऊस गाळपास पाठवून सहकार्य करावे असे परिपत्रक कारखान्याचे चेअरमन व जनरल मॅनेजर यांच्या सहीने काढलेले आहे.ओंकार साखर कारखाना एफआरपी + 350 = 2550 असा दर जाहीर केलेला आहे. तर माळशिरस तालुक्यातील साखर कारखान्यांची एफआरपी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना 2485/-, श्री श्री सद्गुरू राजेवाडी साखर कारखाना 2660/-, श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपुर 2600/- एक जानेवारीनंतर 2650 /- एक मार्च नंतर 2700/- अशी एफआरपी बसत आहे. ओंकार साखर कारखाना एफआरपीपेक्षा जादा दर देणारा कारखाना सध्यातरी ठरलेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng