चांदापूरी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त ८० रक्तदात्यांचे रक्तदान

पिलीव (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील चांदापूरी येथील शेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने धर्मवीर छत्रपती‌ संभाजीराजे महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची संयुक्त जयंतीनिमित्त जयंती उत्सव समितीच्यावतीने चांदापूरी येथे‌‌ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन शेतकरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन भजनदास चोरमले यांच्या हस्ते पूण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर व धर्मवीर छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी चेअरमन भजनदास चोरमले, उपसरपंच संतोष कोपनर, अभिजीत जाधव संस्थापक अध्यक्ष शेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, विलासनाना चोरमले, शंकर पूकळे, दत्तात्रय पाटील, डॉ. निलेश चोरमले, संतोष कोळेकर, राजू वाघ व मान्यवर सदस्य उपस्थितीत होते. यावेळी अक्षय ब्लड बँक सोलापूर यांच्या डॉक्टर व कर्मचारी यांनी रक्तसंकलन केले. यावेळी ८० रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी शेतकरी राजा फाउंडेशनच्या सदस्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसमाजातील युवकांनी आदर्श घ्यावा असे दिलखुलास व्यक्तिमत्व, गोरडवाडीतील उगवता तारा.
Next articleवीज पडण्याआधी मिळणार आता सूचना, जीवित व वित्त हानी टळणार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here