ह.भ.प. शिवलीलाताई पाटील, ह.भ.प. सागर बोराटे महाराज, ह.भ.प. स्वप्निल महाराज दौंडकर यांचे सुश्राव्य किर्तन होणार.
चाकोरे ( बारामती झटका )
संपूर्ण जगाला हादरवून सोडणारा कोरोना संसर्ग रोगाने शहरासह ग्रामीण भागात थैमान घातलेले होते. कोरोना संसर्ग रोगाची दुसरी लाट महाभयंकर होती. त्यामध्ये अनेक समाजामधील लोकांचे निष्पाप बळी गेलेले आहेत. चाकोरे ता. माळशिरस येथील गावामध्ये अनेक लोक कोरोनाने देवाघरी गेलेली आहेत. एक दिवस आड आठवड्यात दोन गुरुवारी तर एकाच दिवशी तीन लोकांचे पुण्यस्मरण आलेले आहे. चाकोरे गावातील लोकांचा कंठ दाटून येत आहे.
दररोज पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमात उपस्थित लोकांच्या डोळ्यासमोर कोरोनाने गेलेल्या व्यक्ती येत असतात. आठवणीने डोळ्यातील पाणी थांबत नाही. ऊर भरून येतो. गावामध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य हानी झालेली असून मौल्यवान हिरे परिवाराला व गावाला सोडून गेलेली आहेत.
गुरुवार दि. 21/4/2022 रोजी 10 ते 12 या वेळेमध्ये चाकोरे पंचक्रोशीत तीन ठिकाणी प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम होणार आहे. स्वर्गीय ॲड. विकास मोहन शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. शिवलिला ताई पाटील यांचे सुश्राव्य किर्तन चाकोरे ( शिंदेवस्ती ) प्रतापनगर रोड येथे होणार आहे. स्वर्गीय हरिभाऊ शंकर माने यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. सागर महाराज बोराटे यांचे सुश्राव्य किर्तन चाकोरे येथे होणार आहे. स्वर्गीय छाया आण्णा वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प. स्वप्निल महाराज दौंडकर यांचे सुश्राव्य किर्तन चाकोरे प्रतापनगर येथे होणार आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng