चाकोरे (बारामती झटका)
भारतीय आयुर्विमा महामंडळच्या वतीने चाकोरे ता. माळशिरस येथील श्रीमती राधिका भरत कोळेकर यांना त्यांच्या पतीच्या पॉलिसीचा मृत्यू दावा रुपये ९,१५,०००/- प्रदान करण्यात आला आहे.
कै. भरत महादेव कोळेकर यांनी एलआयसी रुपये ८ लाख विमा पॉलिसी घेतली होती. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात एलआयसी च्या वतीने विमा रक्कम व बोनस असे मिळून ९,१५,०००/- त्यांच्या वारसास (पत्नीस) देण्यात आले. याप्रसंगी एलआयसी अकलूजचे शाखा अधिकारी श्री. आगवेकर साहेब, विकास अधिकारी श्री. अमोल काळे व विमा प्रतिनिधी श्री. सागर वरकड आदी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng