चाकोरे येथे जागतिक महिला दिन आदर्श जिल्हा परिषद शाळेत उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा.

जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वाघमोडे तर प्रमुख पाहुण्या सरपंच अर्चनाताई शिंदे होत्या.

माळशिरस ( बारामती झटका )

चाकोरे ता. माळशिरस येथे दि. 8 मार्च जागतिक महिला दिन आदर्श जिल्हा परिषद शाळेत उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला‌. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगलताई वाघमोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून चाकोरे गावच्या सरपंच सौ. अर्चनाताई शिंदे होत्या. सदर कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्या सौ. शितलताई वाघमोडे, सौ. शोभाताई वाघमोडे, गावातील व परिसरातील बहुसंख्य महिला, तसेच शालेय व्यवस्थापन समीतीचे अध्यक्ष श्री. धनंजय वाघमोडे, उपाध्यक्ष श्री. श्यामराव आरडे, सदस्य व सर्व महिला सदस्या उपस्थित होत्या.

जागतिक महिला दिनाची सुरुवात उपस्थित मान्यवर महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बाळासो शिंदे यांनी केले. त्यानंतर शाळेच्यावतीने उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. गावातील सर्व शाळांमधील शिक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा वर्कर यांचा सन्मान जिल्हा परिषद सदस्या सौ. मंगलताई वाघमोडे यांच्यावतीने मानाचा फेटा, मानाची शाल, हार, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.

शाळेतील मुलींनी कर्तुत्ववान महिलांच्या जीवनावर आधारित उत्कृष्ट अशी भाषणे व गीत गायन केले. महिलांसाठी मनोरंजनाच्या स्पर्धा घेऊन प्रत्येक स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना जि. प. सदस्य यांच्यावतीने जाहीर केलेले बक्षीस सौ. शोभाताई वाघमोडे व व्यासपीठावरील उपस्थित महिलांच्या हस्ते देण्यात आले. चाकोरे व चाकोरे परिसरातील पाच अंगणवाड्यांना मंगलताई वाघमोडे यांच्या प्रयत्नातून महिला व बाल विकास विभागामार्फत सॅनिटायझर मशीन बसविण्यात आल्या. सौ. मंगलताई वाघमोडे व सौ. अर्चनाताई शिंदे यांच्यावतीने शाळेतील मुलांना खाऊसाठी प्रत्येकी पाचशे रुपयाचे बक्षीस देण्यात आले. गावातील तरुण मंडळाच्या वतीने सर्व महिला व विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला. मनोरंजनाच्या स्पर्धांचे नियोजन श्री.भारत लवटे सर, श्री. एकनाथ कदम सर व श्री. प्रदीप राजगुरू सर यांनी केले. तर कार्यक्रमाची सुंदरता वाढली ती श्रीम. लता सपकाळ मॅडम व श्रीम. रेश्मा गायकवाड मॅडम यांच्या सुंदर रांगोळी व श्री. निसार पठाण सर यांच्या उत्कृष्ट फलक लेखनाने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री. बाळासो शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्री. भारत लवटे यांनी मानले. जागतिक महिला दिन उत्साहात व विविध कार्यक्रमाने मोठ्या थाटामाटात व दिमाखात संपन्न झाला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अमोल सुळ महाराज मोरोची यांचा गोरडवाडी येथे सुश्राव्य किर्तनाचा कार्यक्रम.
Next articleसोमंथळी येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २१ वे राज्यस्तरीय निवासी शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here