चिरंजीव अरुण मगर पाटील आणि चि.सौ.का. मेघा जाधव यांचा शाहीविवाह सोहळा संपन्न झाला.

मराठमोळ्या पारंपारिक सनई चौघडा, तुतारीच्या निनादात, हलगीच्या कडकडाटात, विद्युत रोषणाईत उत्साही वातावरणात संपन्न.

माळशिरस ( बारामती झटका )

नातेपुते तालुका माळशिरस येथील स्वर्गीय राजाराम केशव मगर पाटील यांचे चतुर्थ चिरंजीव अरुण आणि श्री सुदाम शेठ नामदेव जाधव लोधवडे तालुका माण जिल्हा सातारा यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. मेघा शुभविवाह रविवार दिनांक 26 12 20 21 रोजी दुपारी 3 वाजून 40 मिनिटे या शुभमुहूर्तावर शेतकरी भवन मंगल कार्यालय गोंदवले बुद्रुक, समाधी मंदिर शेजारी गोंदवले सातारा रोड तालुका माण येथे मराठमोळ्या पारंपारिक सनई चौघडा तुतारीच्या निनादात हलगीच्या कडकडाटात विद्युत रोषणाईत उत्साही वातावरणात शिवशाही विवाह सोहळा मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला.

शिवशाही पद्धतीने वधूवरांनी प्रवेश द्वारातून भव्य लग्न समारंभाच्या शामियान्याकडे वाजत गाजत मंगलमय वातावरणामध्ये आगमन झाले. पारंपारिक वाद्यामुळे संपूर्ण परिसर मंगलमय झालेला होता. सर्वांच्या साक्षीने शाही विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह सोहळ्यास भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार राम सातपुते, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ नेते शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, पंचायत समिती सदस्य ज्ञानराज उर्फ माऊली पाटील, माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, जेष्ठ विधीतज्ञ ॲड शिवाजीराव पिसाळ, उद्योजक संतोषआबा वाघमोडे पाटील, युवा नेते रणजीत काळे, फ्लोरा उद्योग समूहाचे मोहितशेठ जाधव, मोरोची गावचे ज्येष्ठ नेते तानाजीराव सुळ, नातेपुते नगरीचे दादासो पलंगे, महेश उराडे, सुरेंद्र दावडा, डूडू सराफ चे मालक रवीशेठ डूडू, लोधावडे गावच्या ज्येष्ठ नेत्या सौ.अनुराधा प्रभाकर देशमुख,माण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीराम पाटील,फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शामराव माडकर ,माजी सदस्य सागर कांबळे, सातारा जिल्हा होम डीवायएसपी अरुण देवकर साहेब, डॉक्टर आदित्य रामहरी रुपनवर, तुकाराम झगडे सर, पंजाब नॅशनल बँकेचे सिनियर मॅनेजर इंग्लिश आटपाडकर किरकसाल चे माजी सरपंच अमोल काटकर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव धन्यकुमार जगदाळे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मनोज दादा पोळ, मजूर फेडरेशनचे चेअरमन आण्‍णासो मगर विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन रंगनाथ दुर्योधन काटकर सामाजिक कार्यकर्ते वसई रमेश काशीद गिरवी चे सामाजिक कार्यकर्ते सुमंत कुलकर्णी उप अभियंता वसंतराव ढाणे उद्योगपती दादासो मगर पुणे व्यावसायिक सागर मगर सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील वाघोजीराव पोळ कुकुडवाड सोसायटीचे चेअरमन एमके आबा उद्योगपती नवनाथ घाडगे राष्ट्रवादी मान तालुका अध्यक्ष राजन काटकर लेडीज चे संचालक संदीप नलावडे, वडजल ग्रामपंचायतचे सरपंच तुळशीराम काटकर, खोड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन केके भोसले सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर संजय भोसले पोलीस उपअधीक्षक प्रशांत कदम राहुल पदमण पोलीस निरीक्षक किन्दे साहेब आप्पासाहेब भांड राष्ट्रसंत भाऊ महाराज पंराडे .राष्ट्रवादी पुणे शहर अध्यक्ष रोहण बोडवे, संजय झगडे माळशिरस तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एमडी माने देशमुख, मराठा सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी पवार, माळशिरसचे तलाठी सचिन पाटील, तहसील कार्यालयातील आनंद गायकवाड, हिन्दुस्तान पेट्रोलियम चे प्रशासकीय अधिकारी अग्रवालसोबारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पोलिस. राजकीय. प्रशासकीय अधिकारी व सर्व मित्र आप्तेष्ट पाहुणे आदि मान्यवर यांच्या उपस्थित पार पडला.


सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी संपूर्ण पोशाख कार्यवाहक लक्ष्मणराव राजाराम मगर पाटील यांना देशमुख परिवाराकडून मानाचा पोशाखाचा आहेर करण्यात आला. आलेल्या सर्व मित्रपरिवार आप्तेष्ट नातेवाईक सर्वांचे आदराने स्वागत मगर पाटील परिवारातील रामलक्ष्मणाची जोडी बाळासाहेब व लक्ष्मणराव दोघे स्वागत करीत होते.
लग्न समारंभाचे शब्द सुमनानी स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे म्हाडा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे व वडूजचे प्राध्यापक जगदाळे सर यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleची.सौ. का. वृषाली काळे आणि चिरंजीव निलेश गलंडे यांच्या शुभविवाहाचे आयोजन.
Next articleदादासाहेब वाघमोडे गटाच्या मनाच्या मोठेपणा मुळे भांबुर्डी गावच्या सरपंच पदाची संधी – महादेव वाघमोडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here