नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते येथील स्व.राजाराम केशव मगर पाटील यांचे चतुर्थ चिरंजीव अरुण व श्री सुदाम शेठ नामदेव जाधव रा. लोधवडे तालुका माण यांची कन्या चि. सौ. का. मेघा यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 27/ 12 /20 21 रोजी गोंदवले येथे संपन्न झालेला आहे. शुभविवाह प्रीत्यर्थ स्वागत समारंभ व प्रीती भोजनाचे आयोजन गुरुवार दिनांक 30/ 12/ 2021 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेमध्ये आयोजित केलेले आहे. तरी मित्रपरिवार नातेवाईक आपण सहपरिवार सहकुटुंब राजाराम मगर पाटील शेती फार्म नातेपुते – फलटण रोड झगडे वस्ती शेजारी नातेपुते तालुका माळशिरस येथे येऊन वधूवरांना शुभ आशीर्वाद देऊन स्नेह भोजनाचा आस्वाद घ्यावा यासाठी आपणास ” सस्नेह निमंत्रण ” निमंत्रक श्री लक्ष्मण राजाराम मगर पाटील श्री बाळासाहेब राजाराम मगर पाटील यांच्या वतीने देण्यात आलेले आहे.

सोमवार दिनांक 27/ 12/20 21 लग्न समारंभाची मोठी तारीख होती. त्यादिवशी अनेक लोकांचे अनेक ठिकाणी विवाह असल्याने मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या मनामध्ये विवाहास उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याची इच्छा होती . परंतु विवाह सोहळ्यास उपस्थित राहता आले नाही. विवाह सोहळा गोंदवले तालुका माण येथे असल्यानेही अनेकांना उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे मगर पाटील परिवार यांनी शुभविवाह प्रीत्यर्थ स्वागत समारंभ व प्रीती भोजनाचे आयोजन केलेले आहे. याचा सर्वांनी लाभ घेऊन प्रेमाचे व मैत्रीचे नाते अधिक दृढ करावे असे आवाहन राम लक्ष्मणाची जोडी असणारे लक्ष्मणराव व बाळासाहेब मगर पाटील यांनी केलेले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng