चिरंजीव रोहित कदम पाटील व चि. सौ .का. स्मिता काटकर यांचा शाहीविवाह थाटात संपन्न.

खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, मदनसिंह मोहिते पाटील, हिंदुराव माने पाटील, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, गणपततात्या वाघमोडे, प्रकाशबापू पाटील, दत्तूकाका रणवरे, शंकरनाना देशमुख, डॉ. मारुतीराव पाटील, के के पाटील, नितीनराजे निंबाळकर ,रमेश पाटील, बाळासाहेब सरगर, बाबासाहेब माने, किशोरभैया सुळ पाटील, बाळासाहेब कर्णवर पाटील, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.


मळोली ( बारामती झटका )

मळोली येथील तालुका माळशिरस येथील स्वर्गीय शिवाजीराव लक्ष्मणराव कदम पाटील यांचे नातू व श्री सुरेशराव शिवाजीराव कदम पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि वडजल तालुका माण येथील स्वर्गीय महादेव सखाराम काटकर यांची नात श्री सुरेशराव महादेव काटकर यांची सुकन्या चि. सौ. का. स्मिता यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 13/ 12 /20 21 रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटे या शुभमुहूर्तावर सिताराम मल्टीपर्पज हॉल दिवडपाटी म्हसवड – सातारा रोड तालुका माण जिल्हा सातारा येथे शाही विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.


यावेळी सदाशिवराव माने विद्यालयाचे माजी सभापती हिंदुराव माने पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील, ज्येष्ठ नेते गणपततात्या वाघमोडे, श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाशबापू पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, भाजपचे प्रांतिक सदस्य व सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस के .के .पाटील, माळशिरस नगरपंचायत चे उपनगराध्यक्ष डॉ. मारुतीराव पाटील, सातारा जिल्हा शिवसेना अध्यक्ष हणमंतराव चौरे तात्या,श्री शंकर सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगर संचालक दत्तूकाका रणवरे, माळशिरस तालुका खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन नितीनराजे निंबाळकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती हंसराज माने पाटील, माळशिरस पंचायत समितीचे गटनेते रणजीतसिंह जाधव, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य उद्योजक दत्तात्रय शेळके, राष्ट्रवादीचे नेते रमेश पाटील, राजाराम पेट्रोलियमचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर उद्योजक लक्ष्मणराव मगर पाटील,

भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबासाहेब माने, श्री शंकर सहकारी साखर कारखाना बचाव समितीचे अध्यक्ष भानुदास सालगुडे पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एडवोकेट नागेश काकडे, रघुनाथ दादा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिचंद्र जाधव, शिवशंभो प्रतिष्ठान चे अध्यक्ष शशांक उर्फ भैया पाटील,सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रभाकर इंगळेसर देशमुख, शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीबापू जाधव, शिपाई वाडी सोसायटीचे चेअरमन ज्येष्ठ नेते दादासाहेब माने, राजमाता रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गोरख जानकर, भाजपचे तालुका उपाध्यक्ष युवराज वाघमोडे, काँग्रेसचे तालुका सरचिटणीस शामराव बंडगर, युवा नेते गोरख देशमुख, आप्पासो वाघमोडे (आप्पा मिस्त्री ), युवा नेते आबासाहेब माने, जय मल्हार उद्योग समूहाचे उमेश बनकर, युवा नेते विराज निंबाळकर, तरंगफळ सरपंच ज्ञानेश्वर उर्फ माऊली कांबळे, विजयवाडीचे माजी सरपंच धैर्यशील लावंड, भांबुर्डी चे माजी सरपंच दादासाहेब वाघमोडे, खुडूसचे माजी सरपंच रामनाना चौगुले, डोंबळवाडी चे माजी सरपंच दादासाहेब पाटील, मळोली गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजीराव पाटील, माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, माजी पोलीस पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग उर्फ अप्पासो जाधव पाटील, ज्येष्ठ नेते जग्गूदादा जाधव,

शिवशंकर सोसायटीचे माजी चेअरमन महादेवराव जाधव, धानोरे सोसायटीचे माजी चेअरमन धर्मराज जाधव, शिवपार्वती दुध संस्थेचे चेअरमन अंकुश देवकते, गोरडवाडीचे चेअरमन खंडूतात्या कळसुले, गोरडवाडी गावचे जेष्ठ नेते भागवत पाटिल,गोरडवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य पांडुरंग पिसे, मळोली गावचे माजी सदस्य हरिदास पाटील, उद्योजक मुबारक कोरबु, नवनाथ साठे, विकास शिंदे, प्रगतशील बागायतदार आनंदराव ठवरे, वस्ताद हनुमंतराव देशमुख, रेणुका हॉटेल चे मालक शिवाजीराव सपकाळ, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, सर्जेराव जानकर, दादासाहेब घुले, एमडी सरगर, तानाजी वाघमोडे, भांबुर्डी ग्रामपंचायत सदस्य विष्णू वाघमोडे, ग्रामविकास अधिकारी संतोष पानसरे, क्रषी पर्यवेक्षक सचिन फुले, क्रषी सहाय्यक रणजित वलेकर, दत्तात्रय पांढरमिसे, नाळे साहेब, ज्येष्ठ पत्रकार भारत मगर, माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष निनाद पाटील, तानाजी वाघमोडे, कृष्णा लावंड, संजय हुलगे, स्वप्निलकुमार राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते.


वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी माढा लोकसभा मतदार संघाचे विद्यमान लोकप्रिय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोरभैया सुळ पाटील, श्री श्री सद्गुरू कारखाना राजेवाडी व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अजितभैया बोरकर, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कर्णवर पाटील,माळशिरस पंचायत समितीचे सदस्य अजय सकट, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे, गुरसाळे ग्रामपंचायत सदस्य माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष गणेश काटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष साहिल आतार, गोरडवाडी चे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, उद्योजक विकास देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शिलेदार समाधान काळे, आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.
महा विकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आमदार राम सातपुते यांनी शुभ संदेशाद्वारे वधुवरांना शुभेच्छा दिल्या.


महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील परिवाराच्या वतीने कदम पाटील यांना संपूर्ण कपड्याचा आहेर करण्यात आला.
शाही विवाह सोहळ्यासाठी मळोली, वडजल, अकलूज, विजयवाडी, उदमाईवाडी, बारामती, इंदापूर, फलटण, उंब्रज, नाशिक, पाचोरा, मुंबई, कल्याण, ठाणे ,पनवेल, आदी गावांसह पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर येथील मित्र परिवार व नातेवाईक उपस्थित होते. शाही विवाह सोहळ्याचे शब्द सुमनानी स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी केले. प्रेषक श्रीनिवास कदम पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.


शाही विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर अनेक मान्यवर नेतेमंडळी मित्रपरिवार नातेवाईक यांची सोय-गैरसोय लग्न घाईगडबडीतच्या मध्ये झालेली असेल तर कदम पाटील परिवार यांचेकडून आपली दिलगिरी व्यक्त करून आपले स्नेहाचे नाते दिवसेंदिवस वृद्धिंगत होओ हीच कदम पाटील परिवार यांचेकडून अपेक्षा होत आहे.
आपला निवासकाका

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस या संघटनेचे राज्यस्तरीय दुसरे महाअधिवेशन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार
Next articleमांडवे गावच्या चौकाची शोभा हनुमान मंदिराने वाढली – अर्जुन दुधाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here