विझोरी ( बारामती झटका )
श्री. भिमराव ईश्वरा राचकर मु. पो. विझोरी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभयसिंह राचकर आणि श्री. सुधाकर शालिग्राम काळे मु. पो मळसुर, ता. मालेगाव, जि. वाशिम यांची द्वितीय कन्या चि. सौ. कां. नेहा काळे आणि श्री. भीमराव ईश्वरा राचकर मु.पो. विझोरी, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव विश्वजीत राचकर व श्री. दिपकराव गणपतराव शिंदे पाटील रा. महातपुरी, ता. गंगाखेड, जि. परभणी यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. वैष्णवी शिंदे पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 11/02/2023 रोजी सायंकाळी 06 वाजून 30 मिनिटे या गोरज शुभमुहूर्तावर मु. पो. विझोरी, ता. माळशिरस येथील निवासस्थानी संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे, शेतीनिष्ठ शेतकरी व महाराष्ट्र शासनाचा उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त श्री. पांडुरंग ईश्वरा राचकर व समस्त राचकर परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng