श्री. नागनाथ राऊत आणि श्री. नंदकुमार जाधव यांच्या रेशीमगाठी ऋणानुबंधात बांधल्या जाणार
मांडवे (बारामती झटका)
श्री. सावळा धोंडीबा राऊत यांचे नातू व श्री. नागनाथ सावळा राऊत रा. मांडवे, ता. माळशिरस यांचे द्वितीय चि. ज्ञानेश्वर (पीएसआय) आणि श्री. परशुराम साधू जाधव यांची नात व श्री. नंदकुमार परशुराम जाधव रा. सांगवी, ता. बारामती यांची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. प्रिया (एमबीए ऍग्री) यांचा शाही शुभ विवाह सोहळा सोमवार दि. ३१/१०/२०२२ रोजी दुपारी ३.३५ वाजता शिवतीर्थ मंगल कार्यालय, माळेगाव कारखाना, ता. बारामती, जि. पुणे येथे संपन्न होणार आहे.



तरी सदर शाही शुभविवाह सोहळ्यास मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन राऊत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.


लग्न घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते निमंत्रण अथवा आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. न मिळाल्यास हेच निमंत्रण व आमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, अशी विनंती राऊत परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

