चि. डॉ. आशिष मोटे पाटील फोंडशिरस आणि चि.सौ.कां. डॉ. सुवर्णा वाघमोडे पाटील उंबरे दहिगाव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

शाही विवाह सोहळ्याचे प्रेषक करमाळा माढा विधानसभेचे माजी आ. नारायणआबा गोविंदराव पाटील व श्री. डॉ. माणिकराव कृष्णा मोटे पाटील यांचेकडून नातेवाईक व मित्रपरिवार यांना उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण.

फोंडशिरस ( बारामती झटका )

स्व. कृष्णा गोविंद मोटे पाटील यांचे नातू व श्री. डॉ. माणिकराव कृष्णा मोटे पाटील रा. फोंडशिरस यांचे चिरंजीव डॉ. आशिष मोटे पाटील आणि श्री. आण्णा बाबा वाघमोडे पाटील यांची नात व श्री. शिवाजी आण्णा वाघमोडे पाटील रा. उंबरे दहिगाव यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां. डॉ. सुवर्णा वाघमोडे पाटील यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 18/06/2022 रोजी सायं. 05 वा. 01 मि. या शुभमुहूर्तावर आनंदी गणेश मंगल कार्यालय व लॉन्स आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर शुभ मंगल विवाह सोहळ्यास मित्र परिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करमाळा माढा विधानसभेचे माजी आमदार श्री. नारायणआबा गोविंदराव पाटील व श्री. डॉ. माणिकराव कृष्णा मोटे पाटील यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण निमंत्रण देण्याचा मोटे पाटील आणि वाघमोडे पाटील दोन्हीकडील परिवाराने प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने आपणांस निमंत्रण मिळाले नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे श्री. डॉ. माणिकराव मोटे पाटील व समस्त मोटे पाटील परिवार फोंडशिरस यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसहकार महर्षी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या अध्यक्षपदी विजय मंडलिक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
Next articleपंचायत राज समिती दौर्‍याने माळशिरस पंचायत समिती हादरली, अधिकारी व कर्मचारी अलर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here