चि. तानाजी शिंदे आणि चि.सौ.कां. कोमल लटके यांचा ९ जानेवारी रोजी शुभ विवाह

वेळापूर (बारामती झटका)

वेळापूर ता. माळशिरस येथील कै. मारुती साधू शिंदे यांचे नातू व सौ.लतिका व श्री. बाळकृष्ण शिंदे यांचे चिरंजीव तानाजी आणि मोहोळ येथील सौ. माधुरी व श्री. भारत लटके यांची सुकन्या चि.सौ.कां. कोमल यांचा शुभ विवाह रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी दु. १२ वा. २१ मि. अक्षता मंगल कार्यालय, माळशिरस, ६१ फाटा अकलूज रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे.

विवाह म्हणजे दोन जीवांचेच नव्हे तर दोन कुटुंबाचे मधुर मिलन असते. अशा या सोहळ्यास उपस्थित राहून वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी यावे, असे आग्रहाचे निमंत्रण शिंदे कुटुंबियांच्या वतीने नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट यांना करण्यात आले आहे. आपणास निमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसद्गुरुचे चेअरमन एन. शेषागिरीराव यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव.
Next articleविज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत चि. सर्वेश प्रशांत राजे जिल्ह्यात प्रथम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here