देवकते मोटेवाडी, वीरकर कचरेवाडी, मासाळ शेंडगेवाडी, कोळेकर मोटेवाडी, सरगर माळशिरस यांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार.
माळशिरस ( बारामती झटका)
श्री. नामदेव धोंडीबा देवकते यांचे नातू व श्री. तुकाराम नामदेव देवकते रा मोटेवाडी, ता. माळशिरस यांचे ज्येष्ठ चिरंजीव दादासो देवकते आणि कै. विठोबा म्हाकू वीरकर यांची नात व श्री. रामचंद्र विठोबा वीरकर रा. कचरेवाडी, ता. माळशिरस यांची कनिष्ठ सुकन्या चि. सौ कां. शितल उर्फ साक्षी विरकर यांचा शुभविवाह होणार आहे.

श्री. नामदेव धोंडीबा देवकते यांचे नातू व श्री. तुकाराम नामदेव देवकते रा. मोटेवाडी ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव जनार्धन व श्री. महादेव धुळा मासाळ यांची नात व श्री. चंद्रकांत महादेव मासाळ रा. शेंडगेवाडी, ता. पंढरपूर यांची सुकन्या चि. सौ. कां. साक्षी मासाळ यांचा शुभविवाह होणार आहे.

श्री. सोपान नारायण कोळेकर यांचे नातू व श्री. दामू सोपान कोळेकर रा. मोटेवाडी यांचे ज्येष्ठ चिरंजीव यशवंत व स्व. रामा नातू सरगर यांची नात व श्री. हनुमंत रामा सरगर रा. माळशिरस यांची सुकन्या चि. सौ. कां. माधुरी यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे.

मोटेवाडी देवकते, कचरेवाडी विरकर, मासाळ शेंडगेवाडी, कोळेकर मोटेवाडी, माळशिरस सरगर यांचा शाही शुभविवाह सोहळा मोटेवाडी माळशिरस देवकते मळा येथे रविवार दि. 09/10/2022 रोजी दुपारी 02 वाजून 05 मिनिटे या शुभमुहूर्तावर होणार आहे. सदर शाही विवाहाचे प्रेषक श्री. हनुमंत संपत वगरे ग्रामविकास अधिकारी, श्री. तानाजी केरवा देवकते चिप इंजिनियर, ओंकार साखर कारखाना चांदापुरी, श्री. शरद रामचंद्र देवकर मुख्य शेती अधिकारी, शरयू ऍग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कापशी ता. फलटण, श्री. बाळासाहेब नामदेव देवकते रा. मोटेवाडी यांच्यावतीने सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांना शाही शुभविवाहाचे आग्रहाचे निमंत्रण आहे.
लग्नाच्या घाई गडबडीत नजरचुकीने निमंत्रण अथवा आमंत्रण न मिळाल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे देवकते, वीरकर, मासाळ, कोळेकर, सरगर परिवारांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
