मेडद गावचे गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ह.भ.प. शिवाजीराव तुपे व महाळुंग गावचे शहाजी वाघ परिवारांचा शाही विवाह सोहळा संपन्न होणार.
माळशिरस ( बारामती झटका )
मेडद ता. माळशिरस येथील श्री. चंदर साधू तुपे यांचे नातू व गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ह.भ.प. श्री. शिवाजीराव चंदर तुपे रा. मेडद यांचे द्वितीय चिरंजीव प्रज्योत आणि महाळुंग ता. माळशिरस येथील स्वर्गीय विठ्ठलराव सोपान वाघ यांची नात व प्रगतशील बागायतदार श्री. शहाजी विठ्ठल वाघ यांची सुकन्या चि.सौ.कां. शिवानी यांचा शुभमंगल विवाह सोहळा रविवार दि. १७/०४/२०२२ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटे या शुभ मुहूर्तावर श्री आनंदी गणेश मंगल कार्यालय आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे आयोजित करण्यात आला आहे.

तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती सौ. इंदिराबाई श्री. चंदर तुपे, सौ. जयश्री व श्री. शिवाजीराव तुपे, सौ. नम्रता व श्री. तुकाराम तुपे, सौ. हर्षदा व श्री. विठ्ठल तुपे आणि समस्त तुपे परिवार यांच्यावतीने मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ यांना करण्यात आलेली आहे. आपण उपस्थित राहून वधू-वरांना आशीर्वाद द्यावेत. आपणास हस्ते परहस्ते आमंत्रण निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजर चुकीने आपणास आमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजुन येण्याचे अगत्य करावे, असे आवाहन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ह.भ.प. शिवाजीराव तुपे यांनी केले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
