चि. राजेश आणि चि.सौ.कां. शुभांगी यांचा शुभविवाह संपन्न होणार

माळशिरस येथील वाघमोडे परिवार आणि वळकुंदे परिवार यांच्या रेशीमगाठी जुळणार

माळशिरस (बारामती झटका)

कै. रस्तुम संभाजी वाघमोडे यांचे नातू आणि श्री. हणमंत रस्तुम वाघमोडे रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे द्वितीय चिरंजीव राजेश आणि श्री. शिवाजी अनंता वळकुंदे यांची नात व श्री. धनाजी शिवाजी वळकुंदे रा. माळशिरस, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची ज्येष्ठ सुकन्या चि.सौ.कां. शुभांगी यांचा शुभविवाह रविवार दि. १५/५/२०२२ रोजी दु. १२.२२ मि. या शुभ मुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस, ६१ फाटा, अकलूज रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार यांनी शुभविवाह कार्यास उपस्थित राहून नववधूवरांस आशीर्वाद द्यावे, असे आवाहन वाघमोडे आणि वळकुंदे परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

घाईगडबडीत मित्र परिवार व नातेवाईक यांना हस्ते परहस्ते निमंत्रण आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण देण्याचे विसरले अथवा राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त वाघमोडे परिवार यांचेकडून करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपशब्द वापरले प्रकरणी माळशिरस कोर्टाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला
Next articleकण्हेर गावांमध्ये भारतीय जनता पक्षाला पडले खिंडार, माजी उपसरपंचासह अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here