चि. सागर खुपसे आणि चि.सौ.कां. शितल गोरे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे.

देशमुख पट्टा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., कचरेवाडी सोसायटीचे चेअरमन व सिध्दीविनायक डेव्हलपर्स ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सचिन देशमुख उर्फ तात्यासाहेब यांचे उपस्थित राहण्याचे आवाहन

माळशिरस ( बारामती झटका )

श्री. दादा गोपाळ खूपसे यांचे नातू व श्री. बाळासाहेब दादा खूपसे रा. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव सागर आणि श्री. पांडुरंग महादेव गोरे यांची नात व श्री. ज्ञानदेव पांडुरंग गोरे रा. कचरेवाडी यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. शितल यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 26/05/2022 रोजी दुपारी 12 वाजून 55 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा, माळशिरस अकलूज रोड, माळशिरस या ठिकाणी होणार आहे. तरी मित्रपरिवार, नातेवाईक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खूपसे परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

सदर शाहीविवाह सोहळा कार्यक्रमाचे निमंत्रक देशमुख पट्टा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कचरेवाडी सोसायटीचे विद्यमान चेअरमन व सिद्धिविनायक डेव्हलपर्स ग्रुपचे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर सचिन देशमुख उर्फ तात्यासाहेब यांनी सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केलेले आहे. हस्ते परहस्ते निमंत्रण व आमंत्रण दिलेले आहे. नजरचुकीने निमंत्रण देण्यास राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे खूपसे परिवार यांच्यावतीने निमंत्रक सचिन देशमुख ऊर्फ तात्यासाहेब यांनी आवाहन केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous article40345 07 Bitcoin Btc To Us Dollar Usd
Next articleमाळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीकांत खरात यांची पदोन्नतीने अहमदनगर येथे बदली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here