उत्तमराव जानकर, शिवाजीराव कांबळे, तुकारामभाऊ देशमुख, गौतमआबा माने, महादेव देशमुख, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, पाडुरंग देशमुख, काकाराम घुले, अजय सकट, हनुमंत सरगर, दादासाहेब वाघमोडे, विष्णूभाऊ गोरड यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न
माळशिरस ( बारामती झटका)
श्री. दादा गोपाळ खुसपे यांचे नातू व श्री. बाळासाहेब दादा खुसपे रा. माळशिरस यांचे चि. सागर खुसपे आणि श्री. पांडुरंग महादेव गोरे यांची नात व श्री. ज्ञानदेव पांडुरंग गोरे रा. कचरेवाडी यांची सुकन्या चि.सौ.कां. शितल गोरे यांचा आणि श्री. नारायण एकनाथ सिद पाटील रा. माळशिरस यांचे कनिष्ठ चि. दिपक सिद पाटील आणि श्री. नवनाथ हरिभाऊ शेंडगे, रा. मोडनिंब, ता. माढा यांची सुकन्या चि.सौ.कां. अश्विनी शेंडगे यांचा शाही शुभविवाह सोहळा गुरुवार दि. 26/05/2022 रोजी दुपारी 12.55 वा. मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा माळशिरस अकलूज रोड, माळशिरस येथे शाही शुभविवाह सोहळा संपन्न झाला.
या शुभविवाह सोहळ्यास सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराव कांबळे, माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य माळशिरस शहराचे संयमी नेतृत्व तुकाराम भाऊ देशमुख, माळशिरस पंचायत समितीचे ज्येष्ठ सदस्य गौतमआबा माने, पंचायत समितीचे रणझुंजार सदस्य अजयजी सकट, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर महादेवतात्या देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, माळशिरस नगरपंचायतचे नगरसेवक वस्ताद विजयराव देशमुख, माजी नगरसेवक मारुती उर्फ आप्पासाहेब देशमुख, गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड, काँग्रेस पक्षाचे नेते प्रगतशील बागायतदार पांडुरंगतात्या देशमुख, युवा उद्योजक सचिन आप्पा वावरे, भाजपचे माजी माळशिरस तालुका अध्यक्ष पांडुरंगतात्या वाघमोडे, भाजपा किसान मोर्चाचे माळशिरस तालुका अध्यक्ष हनुमंत सरगर, काकाराम घुले, माजी पंचायत समिती सदस्य अनिल सावंत, दादासाहेब वाघमोडे, आप्पा मिस्त्री वाघमोडे, कोंडबावी गावचे माजी सरपंच विष्णुपंत घाडगे, वस्ताद सर्जेराव घोडके, महान मल्ल आप्पासाहेब टेळे, अशोकदादा देशमुख, हनुमंतराव देशमुख आदी मान्यवरांसह कचरेवाडी, मोडनिंब, माळशिरस पंचक्रोशीतील नातेवाईक व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने वधूवरांना शुभ आशीर्वाद दिले. शाही विवाह सोहळ्याचे निमंत्रक देशमुख पट्टा विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन व सिध्दीविनायक डेव्हलपर्स ग्रुपचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सचिन देशमुख उर्फ तात्यासाहेब यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले. लग्न समारंभाचे सूत्रसंचालन श्रीनिवास कदम पाटील यांनी केले होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng