माळशिरस ( बारामती झटका )
माळशिरस येथील स्वर्गीय एकनाथ नारायण वाघमोडे यांची नात व श्री. तानाजी एकनाथ वाघमोडे यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. अहिल्या आणि गोरडवाडीचे स्वर्गीय नारायण साधू गोरड यांचे नातू व श्री. दादा नारायण गोरड यांचे द्वितीय चिरंजीव शिवाजी यांचा शुभविवाह गोरडवाडी राम मंदिर येथे दि. 24/04/2022 रोजी 12 वाजून 37 मिनिटांनी संपन्न होणार आहे.
माळशिरस येथील 60 फाटा या ठिकाणी वास्तव्यास असलेले तानाजी वाघमोडे यांचा मेडिकलचा व्यवसाय गेली अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यांच्या धर्मपत्नी सौ. शोभा वाघमोडे यांनीही उद्योग व्यवसाय सुरू केलेला आहे. माळशिरसमध्ये उद्योग क्षेत्रात प्रतिकूल परिस्थितीत गगन भरारी घेणारे हे वाघमोडे दांपत्य आहे. त्यांना उद्योग व्यवसायामध्ये मुलींचा हातभार असतो. त्यांची कन्या अहिल्या हिचा विवाह होत आहे. पहिल्यांदा वधू मातापिता कन्यादान करणार आहेत. तानाजी वाघमोडे व शोभा वाघमोडे यांनी उद्योग व्यवसाय करत पत्रकारिता सुरू केलेली आहे. कमी दिवसांमध्ये आपले चांगले नाव केलेले आहे.

त्यांच्या घरातील पहिलेच शुभकार्य असल्याने मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह मंगल कार्यास उपस्थित रहावे. आपणांस निमंत्रण आमंत्रण हस्ते परहस्ते दिलेले आहे. नजर चुकीने निमंत्रण राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे सौ. शोभा व श्री. तानाजी वाघमोडे यांच्यावतीने नम्र विनंती आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng