चि.सौ.कां. ऐश्वर्या ठवरे पाटील आणि चिरंजीव अभिजीत हाके यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील यांची पुतणी व माजी सरपंच ॲड. शहाजीकाका ठवरे पाटील यांच्या कन्येच्या शाही शुभविवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांची मांदियाळी उपस्थित राहणार आहेत.

माळशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्रआबा ठवरे पाटील यांची पुतणी व खुडूस गावचे माजी सरपंच ॲड. शहाजीकाका ठवरे पाटील यांची सुकन्या चि. सौ. कां. ऐश्वर्या आणि पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावचे श्री चांगदेव नारायण हाके यांचे चिरंजीव अभिजीत यांचा शाही शुभ विवाह सोहळा रविवार दि. 17/04/2022 रोजी दु. 12 वाजून 34 मिनिटे या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय 61 फाटा माळशिरस अकलूज रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे. तरी सदर शाही शुभविवाह सोहळ्यास अनेक मान्यवरांची मांदियाळी उपस्थित राहणार आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे ठवरे पाटील परिवार यांचेकडून आग्रहाचे निमंत्रण आहे. नजरचुकीने हस्ते परहस्ते निमंत्रण आमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजुन येण्याचे अगत्य करावे असे वधूपिता ॲड. शहाजीकाका ठवरे पाटील व समस्त ठवरे परिवार यांच्या वतीने नम्र विनंती आहे.

खुडूस पंचक्रोशीसह माळशिरस तालुक्यात राजकीय, सामाजिक क्षेत्रात दबदबा असणारे ठवरे पाटील परिवार आहे. गेली अनेक वर्ष राजकारणात सत्ता केंद्र स्थानात आहेत. राजकारणाबरोबर समाजकारणातही ठवरे पाटील परिवार बंधूंचे मोठे योगदान आहे. ॲड. शहाजीकाका ठवरे पाटील यांनी खुडूस गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळलेली आहे. 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण शहाजीकाका करीत असतात. लोकांच्या अडीअडचणीला धावून जात असतात. सर्व जाती-धर्मांमध्ये सामाजिक कार्यातून शहाजी काकांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. खुडूस पंचक्रोशीतील सर्वांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणारे शहाजीकाका यांच्या कन्येच्या विवाहासाठी खुडूस पंचक्रोशीतून नातेवाईक, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांची उपस्थिती असणार आहे‌ त्याच बरोबर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून ठवरे पाटील परिवार त्यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा या क्षेत्राबरोबर लोक प्रतिनिधी, न्याय व्यवस्थेतील वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी यांचीही खास उपस्थिती राहणार आहे.

तरी सर्वांनी शाही विवाह सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन ठवरे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleअमृतभैया माने देशमुख सोसायटीच्या निवडणुकीतील विजयाचे पडद्यामागील चाणक्य ठरले.
Next articleसंग्रामनगर येथे साई प्राणप्रतिष्ठापनाचा वर्धापन दिन व श्रीराम नवमी जन्मोत्सव उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here