शुभविवाह सोहळ्याचे प्रेषक माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, निमंत्रक माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव पवार यांच्यावतीने मित्रपरिवार व नातेवाईक यांना उपस्थित राहण्याचे आवाहन.
माळशिरस ( बारामती झटका )
श्री. आगतराव महादेव पवार यांची नात व श्री. रामचंद्र आगतराव पवार रा. इस्लामपूर, ता. माळशिरस यांची जेष्ठ कन्या चि.सौ.कां. काजल आणि स्व. सुदाम निवृत्ती सावंत यांचे नातू व श्री. गोरखनाथ सुदाम सावंत रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर यांचे सुपुत्र चि. संग्रामसिंह यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 26 जून 2022 रोजी सायंकाळी 6 वाजून 45 मिनिटे या गोरज शुभ मुहूर्तावर श्री आनंदी गणेश सांस्कृतिक भवन आनंदनगर, अकलूज, ता. माळशिरस येथे होणार आहे.
सदर शाहीविवाह सोहळ्याचे प्रेषक महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माढा लोकसभेचे माजी खासदार विकासरत्न विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील हे आहेत. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन शाहीविवाह सोहळ्याचे निमंत्रक सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व शिवामृत दूध संघाचे संचालक श्री. लक्ष्मणराव आगतराव पवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

सदर शाहीविवाह सोहळ्याचे आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण व निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने आपणांस आमंत्रण निमंत्रण देण्याचे घाईगडबडीत राहून गेले असल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे निमंत्रक लक्ष्मणराव आगतराव पवार, समस्त इस्लामपूर व पवार परिवार यांच्यावतीने विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng