चि.सौ.कां. डॉ. वर्षाली वाघमोडे पाटील, फोंडशिरस आणि चि. डॉ. जयराम रूपनवर पाटील, एकशिव यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

फोंडशिरस ( बारामती झटका )

माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. मधुकर भानुदास वाघमोडे पाटील रा. फोंडशिरस, ता. माळशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. डॉ. वर्षाली वाघमोडे आणि श्री. कृष्णा लक्ष्मण रुपनवर पाटील रा. एकशिव, ता. माळशिरस यांचे चि. डॉ. जयराम यांचा शाही शुभविवाह सोहळा शनिवार दि. 09/07/2022 रोजी दुपारी 02 वाजून 05 मिनिटे या शुभमुहूर्तावर चैतन्य मंगल कार्यालय, नातेपुते-दहिगाव रोड, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे संपन्न होणार आहे. तरी सर्व मित्रपरिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सौ. शोभाताई व श्री. मधुकर वाघमोडे पाटील व समस्त वाघमोडे पाटील परिवार यांच्यावतीने करण्यात येत आहे.

सदर शाही शुभविवाह सोहळ्याचे स्वागतोत्सुक वाघमोडे पाटील, सर्व प्रतिष्ठित आजी माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक व हितचिंतक आहेत. लग्न सोहळ्याचे आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण निमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लग्नाच्या घाईगडबडीत नजर चुकीने आपणापर्यंत आमंत्रण निमंत्रण देण्याचे विसरले अथवा राहिले असल्यास हेच आमंत्रण निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे, असे माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य मधुकर वाघमोडे पाटील यांच्यावतीने नम्र आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleईश्वराची दररोज मनोभावे भक्ती केल्यास आत्मिक समाधान व खरा आनंद लाभतो – व्हा.चेअरमन अशोक लुणावत
Next articleशितल चौगुले “उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शीका 2022” पुरस्काराने सन्मानीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here