चि.सौ.कां. रोहिणी माने पाटील आणि चि. पियुष धायगुडे-पाटील यांचा शुभविवाह थाटात संपन्न.

माजी दुग्ध विकास मंत्री महादेवराव जानकर, अर्जुंनसिंह मोहिते पाटील, बाळासाहेब कर्णवर पाटील, हनुमंतराव सूळ, शंकरनाना देशमुख, डॉ. मारुतीराव पाटील, धैर्यशीलभाऊ देशमुख, गौतमआबा माने, बाळासाहेब सरगर, राजाभाऊ हिवरकर आदी मान्यवरांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती.

नातेपुते ( बारामती झटका )

कन्हेर ता. माळशिरस येथील स्वर्गीय भानुदास माणिकराव माने पाटील यांची नात व श्री. ज्ञानदेव भानुदास माने पाटील यांची सुकन्या चि.सौ.कां. रोहिणी आणि अहिरे ता. खंडाळा येथील श्री. आप्पासाहेब गिरजाप्पा धायगुडे-पाटील यांचे नातू व श्री. शिरीषकुमार आप्पासाहेब धायगुडे पाटील यांचे चि. पियुष यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. ०९.०१.२०२२ रोजी दहीगाव रोड, नातेपुते येथील राजआनंद मंगल कार्यालय येथे कोरोनाचे सर्व शासकीय अटी व नियमांचे पालन करून उत्साहात संपन्न झाला.

सदर विवाहास माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा सरसेनापती महादेवराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मदनसिंह मोहिते पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सूळ, श्री श्री सद्गुरु कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धैर्यशीलभाऊ देशमुख, धुळदेव पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजयतात्या पाटील, पंचायत समिती सदस्य गौतमआबा माने, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, समता परिषदेचे राजाभाऊ हिवरकर, चेअरमन अरुणराव पांढरे, मोरोची गावचे माजी उपसरपंच माऊली सुळ पाटील, माजी सरपंच वावरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे रणजीत सूळ, माऊली सरक, कन्हेरचे माजी सरपंच भरतबापू माने, बाजीराव माने, वन अधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे, संजय गांधी, डॉ. ए. पी. वाघमोडे, मोरोची गावचे युवा नेते दीपक माने, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांसह माळशिरस व खंडाळा तालुक्यासह पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेटवरच उपस्थितांच्या हातावर सॅनिटायझर देऊन हात निर्जंतुक केले जात होते. ज्यांना मास्क नसेल त्यांना कार्याच्या मालकांनी मास्कची उपलब्धता केलेली होती. उपस्थित सर्व मान्यवरांचे आदर सत्कार माने पाटील परिवार यांचेकडून माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अंबादासभाऊ पाटील, राष्ट्रवादीचे नेते रमेशभाऊ पाटील, उपअभियंता धनंजय पाटील, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीच्या सरचिटणीस सौ. सुनीताताई पाटील, डॉ. युवराज पाटील, ज्ञानदेव पाटील, रोहित पाटील, नितीन पाटील यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी शब्द सुमनांनी केले

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाफेगावमध्ये समाजरत्न विष्णुपंत दादरे साहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
Next articleजिजाऊ ब्रिगेड यांच्यावतीने गोविंद वृद्धाश्रमास गरजूंना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू व फळे वाटप.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here