चि.सौ.कां. शुभांगी चांगण, नातेपुते आणि चि. संकेत काटकर, भोर यांचा शाहीविवाह संपन्न…

विधान परिषदेचे आ. रणजितसिंह मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट तर विधानसभेचे आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती

नातेपुते ( बारामती झटका )

श्री. ज्ञानेश्वर उर्फ विजय पुंडलिक चांगण रा. नातेपुते, ता. माळशिरस यांची सुकन्या चि.सौ.कां. शुभांगी आणि श्री. सुनील सदाशिव काटकर रा. भोर, जि. पुणे यांचे द्वितीय चि. संकेत यांचा शाही शुभविवाह सोहळा सोमवार दि‌ 06/06/2022 रोजी सायंकाळी 06.30 वा. या गोरज मुहूर्तावर संपन्न झाला.

सदरच्या शाही विवाहास विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, शिवामृत दूध संघाचे चेअरमन भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट दिलेली होती‌. तर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

राजवैभव सांस्कृतिक भवन येथे चांगण परिवार यांनी गोरज मुहूर्तावर शाही विवाहाचे आयोजन केले होते‌. भव्य स्टेज व शामियान्याची उभारणी करण्यात आलेली होती. गेटवर स्वागतासाठी दुतर्फा चांगण व काटकर परिवार आलेल्या लोकांचे स्वागत करीत होते. बसण्याची उत्तम सोय केलेली होती. वधूवरांना भव्य व्यासपीठाकडे वाजत गाजत आणण्यात आले.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. लोकप्रिय आमदार राम सातपुते यांनी उपस्थित सर्वांच्या वतीने नवदांपत्य शुभांगी व संकेत यांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मालोजीराजे उर्फ आबासाहेब देशमुख, नातेपुते नगरीचे माजी सरपंच व विद्यमान नगरसेवक ॲड. बी. वाय. राऊत, माजी उपसरपंच विद्यमान नगरसेवक दादासाहेब उराडे, नातेपुते नगरपंचायतीचे बांधकाम सभापती अतुलबापू पाटील, नगरसेवक रावसाहेब पांढरे, नगरसेवक दीपकआबा काळे, नगरसेवक शशिकांत बरडकर, उद्योजक अतुलशेठ बावकर, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, माऊली पाटील, अजय सकट, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, ओबीसीचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब खरात, भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजयजी देशमुख, तालुका उपाध्यक्ष प्रवीणजी काळे, नेते शिवराज पुकळे, ॲड. शिवाजीराव पिसाळ, हनुमंत कर्चे, ज्येष्ठ पत्रकार सुनील राऊत, आनंदकुमार लोंढे, बारामती झटका न्यूज चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील आदी मान्यवरांसह नातेपुते पंचक्रोशीतील आजी माजी पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांना तुरेबाज फेटा श्रीकेश वरूडे बांधत होते, तर शब्द सुमनांनी विठ्ठल सूर्यवंशी सर आलेल्या लोकांचे स्वागत करीत होते.सदर शाहीविवाह सोहळ्याचे स्वागतोत्सुक अंकुश अण्णा भांड अध्यक्ष अखिल भारतीय धनगर समाज, श्री. राजेंद्र उर्फ दादासाहेब कुंडलिक उराडे, नगरसेवक नातेपुते नगरपंचायत, विनायक मुरलीधर उराडे, अजितशेठ घुगरे लोणंद यांनी केले. तर निमंत्रक रवींद्र प्रभाकर चांगण मुख्याध्यापक चंद्रकांत घुगरदरे प्रशाला, बाळासाहेब पांडुरंग चांगण, गणेश जालिंदर चांगण, ताराचंद युवराज सांगण, गणेश दिलीप चांगण, मंगेश महादेव देवडे, चिरंजीव राहुल उर्फ माऊली चांगण, डॉक्टर सौरभ अजित चांगण आदी मान्यवरांनी उपस्थितांची उठाठेव केली.

सदर विवाहाचे नेटके नियोजन सौ. शर्मिला संजय चांगण नगरसेविका नातेपुते नगरपंचायत, देविदास उर्फ भैय्या कैलास सांगण भाजप शहराध्यक्ष नातेपुते व चिरंजीव तुषार उर्फ भैय्या ज्ञानेश्वर चांगण यांनी केलेले होते. सदरचा विवाह यशस्वी करण्याकरता आकाश चांगण, अमित चांगण, चैतन्य चांगण, ऋषिकेश चांगण, समीर चांगण, सुरज चांगण, अभिजित चांगण, संकेत चांगण, संजय चांगण, रोहित चांगण, अक्षय चांगण, संकल्प चांगण, वैभव कोलते, प्रज्वल उराडे, शंभू चांगण, धनगर समाज युवक संघटना नातेपुते आदींनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसाहित्य समाजमनाचा आरसा आहे – सुनेत्रा पवार
Next articleभाजपा म्हणजे “काम सरो आणि वैद्य मरो “, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांचं ट्विट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here