चि. सौ. का. वृषाली काळे आणि चिरंजीव निलेश गलंडे यांचा शाही शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न.

नववधूचे सुवर्ण रथातून वाजत गाजत भव्य स्टेजच्या श्यामीयान्या कडे आगमन.

जयसिंह मोहिते पाटील, मदनसिंह मोहिते पाटील, आमदार राम सातपुते, माजी आमदार रामहरी रुपनवर, उत्तमराव जानकर, डॉक्टर रामदास देशमुख अनेक दिग्गज मान्यवरांसह उद्योजकांची खास उपस्थिती.

माळशिरस ( बारामती झटका )

श्री भीमराव संभाजी काळे रा. कामोठे नवी मुंबई मुळगाव भांब तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ .का .वृषाली आणि श्री कृष्णा तात्याबा गलंडे राहणार पुळकोटी तालुका माण जिल्हा सातारा यांचे द्वितीय सुपुत्र चिरंजीव निलेश यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 27/ 12/ 20 21 रोजी दुपारी 01:35 या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस येथे शाही शुभविवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. नववधूंचे सुवर्ण रथातून वाजत गाजत भव्य स्टेजच्या श्यामीयाण्याकडे शुभविवाहाचे खास आकर्षण ठरले. सिनेसृष्टीतील देखावा याची प्रतिकृती तयार केलेली होती.कोरोना संसर्ग रोगाचा संसर्ग होऊ नये याची दक्षता लग्न सोहळा कार्याच्या कार्य वाहकांनी घेतलेली होती. प्रवेशद्वारावर मास्क व सॅनिटायझरचा वापर केला जात होता.

शासकीय नियमांचे पालन करून शाही विवाह सोहळा संपन्न झालेला आहे सदर विवाहाससहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर रामदास देशमुख, श्री श्री सद्गुरु साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, माळशिरस नगरपंचायत चे विद्यमान उपनगराध्यक्ष डॉक्टर मारूतीराव पाटील, लोणंद पंढरपूर रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते ॲड. सोमनाथ वाघमोडे, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती किशोर सुळ पाटील, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुभाष कुचेकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काकासाहेब मोटे, मांडकी गावचे डबल सरपंच किरण माने, अभ्यासू नेतृत्व संघर्ष यात्री दादासाहेब हुलगे धानोरे गावचे सरपंच जीवन जानकर, भांब गावचे सरपंच पोपटराव सरगर, कनेर चे माजी सरपंच सुभाष माने, पळसमंडळचे उपसरपंच रणजीत करे,विविध उद्योग व्यवसायामध्ये गगन भरारी घेतलेले उद्योजक, लक्ष्मण मेटकरी, प्रदीप सुळ, किसन यमगर, भरत जाधव, श्रेयश रोडवेजचे मालक गणेश उके, धनाजी भोसले, बंडू सरगर, रामदास पोखरकर, रामास्वामी थेवर, सतीश राठोड, भालेकर, प्रदीप शेळके, उत्तम यमगर, फक्कड शिंदे, उद्देश ढवळे, फाळके, सोमवार पाटील, रमेश पाटील मुंबई,मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाराम पाटील, शामराव मोटे, शिवसेना नेते रामदासभाई कोकरकर, अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता कर्णवर पाटील, , युवानेते धर्मराज माने,मांडकी सोसायटीचे चेअरमन अशोक रणनवरे आदी मान्यवर उपस्थित होते.वधुवरांना शुभेच्छा देण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उत्तमराव जानकर, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य गौतमआबा माने, अकलूज पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, आदी मान्यवरांनी भेटी दिल्या.

शुभविवाह सोहळ्यास माण, इंदापूर, माळशिरस तालूक्यासह पुणे सोलापूर सातारा मुंबई कामोठा कळंबोली पनवेल नवी मुंबई येथील मित्र परिवार नातेवाईक यांची खास उपस्थिती होती.उपस्थित सर्वांच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विधानपरिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर यांनी वधूवरांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत भांब गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोपान गणपत काळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी महानगरपालिका मुंबई छगन दाजीराम काळे, माजी सरपंच ॲड. शामराव शंकर काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट दाजीराम काळे. समाज विकास अधिकारी महानगरपालिका मुंबई सोनबा नगु काळे, आर के इंटरप्राईजेस प्रोफाइटर पंढरीनाथ गणपत काळे नवी मुंबई पोलीस किसन काळे, सिव्हिल इंजिनिअर प्रज्वल काळे, युवा उद्योजक मुंबई शत्रुघ्न रणनवरे, अथर्व प्रॉपर्टीज कामोठे धनंजय भोसले, सिव्हिल इंजिनिअर संजय काळे, सचिन काळे संदीप वाडकर स्वप्निल रुपनवर बापू काळे प्रवीण काळे.यानी केले.

वधुपिता कार्यकारी अभियंता म्हाडा मुंबई भीमराव संभाजी काळे यांनी आपल्या मुलीचा विवाह गावाकडे घेऊन परिसरातील सर्वांना आठवण रहावी अशा आधुनिक पारंपारिक पद्धतीने विवाह केलेला आहे. सर्वांचा आदर सन्मान बसण्याची बैठक व्यवस्था सुसज्ज, जेवणाचे योग्य नियोजन, अशा सर्व लहान सहान गोष्टी लग्नाच्या घाईगडबडीत सुद्धा नियोजन करणाऱ्या सर्व काळे परिवार यांच्या हितचिंतकांनी केलेले होते सदर शाही विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन बारामतीचे गायकवाड सर आणि श्रीनिवास कदम पाटील यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभाजपमधून तालुका सरचिटणीस संदीप घाडगे व महिला तालुका अध्यक्षा कल्पना कुलकर्णी यांची पक्षातून हकालपट्टी.
Next articleमे.जिल्हा न्यायाधीश यांनी कलम 376 मधील आरोपी नाना महादेव वाघ व नागेश नाना वाघ यांचा जामीन फेटाळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here