माळशिरस ( बारामती झटका )
श्री. भीमराव संभाजी काळे रा. कामोठे नवी मुंबई मुळगाव भांब तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची जेष्ठ सुकन्या चि. सौ .का .वृषाली आणि श्री कृष्ण तात्याबा गलंडे राहणार पुळकोटी तालुका माण जिल्हा सातारा यांचे द्वितीय सुपुत्र चिरंजीव निलेश यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 27/ 12/ 20 21 रोजी दुपारी 01:35 या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस अकलूज रोड या ठिकाणी शुभमंगल कार्य संपन्न होणार आहे.
शुभविवाह सोहळ्याचे स्वागतोत्सुक भांब गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सोपान गणपत काळे, सहाय्यक सुरक्षा अधिकारी महानगरपालिका मुंबई छगन दाजीराम काळे, माजी सरपंच ॲड. शामराव शंकर काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य पोपट दाजीराम काळे. समाज विकास अधिकारी महानगरपालिका मुंबई सोनबा नगु काळे, आर के इंटरप्राईजेस प्रोफाइटर पंढरीनाथ गणपत काळे हे करणार आहेत तर कार्यवाहक नवी मुंबई पोलीस किसन काळे, सिव्हिल इंजिनिअर प्रज्वल काळे, युवा उद्योजक मुंबई शत्रुघ्न रणनवरे, अथर्व प्रॉपर्टीज कामोठे धनंजय भोसले, सिव्हिल इंजिनिअर संजय काळे, सचिन काळे ,संदीप वाडकर, स्वप्निल रुपनवर ,बापू काळे प्रवीण काळे हे आहेत तरी सर्वांना आप्त इष्ट मित्र परिवार नातेवाईक यांना निमंत्रण दिलेले आहे नजरचुकीने निमंत्रण देण्यास घाईगडबडीत राहून गेले असेल तर हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे वधू माता-पिता सौ शोभा व श्री भीमराव संभाजी काळे कार्यकारी अभियंता म्हाडा मुंबई यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng