चोरी दरोड्याच्या घटनेत मिळणार तत्काळ मदत, चोर दरोडेखोर होणार जागेवर जेरबंद.

जिल्ह्यात होणार ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित.

सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हा परिषद सोलापूर यांचा संयुक्त उपक्रम

सोलापूर (बारामती झटका)

मा. जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. तेजस्वी सातपुते मॅडम यांच्या प्रयत्नातून, जिल्हा परिषद सोलापूर व जिल्हा ग्रामीण पोलीस दल व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत आज वेळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील 16 गावांमधील सर्व पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांचेसाठी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे 18002703600 प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रमास कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहिले.

पोलीस स्टेशन हद्दीत संकट काळात आपत्तीग्रस्त नागरिकाने ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 वर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीचा आवाज गावातील सर्व नागरिकांना कॉल स्वरूपात तत्काळ ऐकवला जाणार असल्याने गुन्ह्यांना आळा घालणे शक्य होणार आहे. ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक श्री. डी. के. गोर्डे यांनी नागरिकांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक दाखवले, सर्व सरपंच व नागरिकांनी यंत्रणेत पुढील ४८ तासांत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. सदर कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान खरतोडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस स्टेशन पी.सी. तांबोळी, पी.सी. एलमार
तसेच सर्व बीट अधिकारी व अंमलदार यांनी मेहनत घेवून कार्यक्रमाचे नियोजन केले.

गेल्या 9 वर्षांत पुणे, नाशिक, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील 3500 हून अधिक गावे व ग्रामीण पोलीस स्टेशन ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाले आहेत. ग्रामस्थ आपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत आहेत. संपूर्ण भारतासाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदणी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील हजारो नागरिकांना त्वरित मोबाईल वर ऐकू जातो. परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची उद्दिष्ट

घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे.

गावातील कार्यक्रम / घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे.

अफवांना आळा घालणे.

प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे.

पोलीस यंत्रणेस कायदा व सुव्यस्था कायम राखणे कामी नागरिकांचे सहकार्य मिळणे.

ग्राम सुरक्षा यंत्रणेची वैशिष्ट्ये

संपूर्ण स्वयंचलित यंत्रणा

गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी सोपी पद्धत

संपूर्ण भारतासाठी एकच टोलफ्री नंबर 1800 270 3600

यंत्रणेत सहभागी असलेला कोणताही नागरिक आपत्ती काळात संपूर्ण परिसराला सावध करू शकतो.

संदेश देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजातच संदेश कॉल स्वरुपात परिसरातील नागरिकांना मिळतो.

दुर्घटनेचे स्वरूप, तीव्रता, ठिकाण कळल्याने गावकऱ्यांना विना विलंब व नियोजनबद्ध मदत करता येते.

नियमानुसार दिलेले संदेशच स्वयंचलित रित्या प्रसारित होतात

नियमबाह्य दिलेले संदेश / अपूर्ण संदेश रद्द होतात व प्रसारित होत नाहीत.

एका गावात चोरी करून चोर दुसऱ्या गावच्या दिशेने गेल्यास त्या गावालाही सावध करणे शक्य.

वाहन चोरीचा संदेश आजूबाजूच्या १० कि.मी. परिसरातील सर्व दिशांच्या गावांना तत्काळ मिळतो.

घटनेच्या तीव्रतेनुसार कॉल रिसीव्ह होत नाही तोपर्यंत रिंग वाजते.

संदेश पुढील 1 तास पुन्हा पुन्हा ऐकण्याची सोय. कोणत्याही वेळी आपल्यासाठी संदेश तपासण्याची सोय.

चुकीचा संदेश किंवा मिसकॉल देणारे नंबर आपोआप Black List होतात.

गावाबाहेर किंवा दुसऱ्या गावात अपघातग्रस्त नागरिकाचा संदेश घटना घडलेल्या परिसरातही प्रसारित होतात.

सरकारी कार्यालये / पोलीस स्टेशन आदींना आपापल्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना किंवा विशिष्ट एक किंवा एकापेक्षा जास्त गावांना किंवा कर्मचाऱ्यांना सूचना / आदेश देता येणे शक्य.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleजलयुक्त शिवार घोटाळ्यांच्या आरोपांमुळेच भाजपाकडून इन्कमटॅक्सची छापेमारी बाळासाहेब आपटे.
Next articleडाॅ.सुहास शेळके यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास भाजपच्यावतीने आंदोलनाचा इशारा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here