आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज – भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सुशांत निंबाळकर
विंचुर्णी (बारामती झटका)
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात जनजीवन विस्कळीत झाले. असंख्य लोकांना या आजाराची लागण झाली तर, अनेकजण त्यात दगावले. आज लोकांना या आजाराबरोबरच अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेणे काळाची गरज आहे, हे समजून गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये आयुर्वेदिक सर्वरोग निदान शिबीर घेतले. लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला व लोकांची तपासणी करून त्यांना योग्य उपचार घेण्यास सांगण्यात आले.
या कार्यक्रमावेळी विंचुर्णी गावचे मा. सरपंच व पश्चिम महाराष्ट्र भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष सुशांत निंबाळकर व सातारा जिल्हा आदर्श महिला सरपंच पुरस्कार प्राप्त व विद्यमान सदस्य सौ. अस्मिता निंबाळकर, विंचुर्णी गावच्या सरपंच सौ. राणी चव्हाण, उपसरपंच सौ. पूनम इथापे, सदस्य वैशाली चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक निंबाळकर, पाणीपुरवठा अध्यक्ष अंकुश चव्हाण, बाळासो इथापे, पंढरीनाथ इथापे, विंचुर्णी विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन ज्ञानदेव निंबाळकर, दिलीप घाडगे, बंटी चव्हाण, जयराम चव्हाण, नितीन गायकवाड, जयदीप निंबाळकर, अमोल इथापे, ग्रामसेवक भोसले अण्णा, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिरात डॉ. व्ही. आय. मुजावर BAMS MD AM, डॉ. भगत, डॉ. सिध्दनाथ यांनी आरोग्य विषयी मार्गदर्शन केले व ग्रामस्थांना योग्य तो सल्ला दिला. या शिबिरासाठी लोकांनी दिलेल्या उस्फुर्त प्रतिसादाबद्दल शिबिरातील डॉक्टरांनी समाधान व्यक्त केले. सदर शिबिराला संजीवनी सामाजिक संस्था फलटण यांनी सहयोग दिला.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng