चांदापुरी (बारामती झटका)
चांदापुरी ता. माळशिरस येथे शेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्सव मंडळ, राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ आणि शेतकरी राजा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष अभिजीत जाधव यांच्यावतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि. २०/०५/२०२२ रोजी अहिल्या चौक येथे करण्यात आले आहे.
रक्तदान ही एक काळाची गरज आहे, ही गरज ओळखून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणार्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. या शिबीरात जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng