छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२वी जयंती वाघोलीत विविध उपक्रमाने साजरी।

वाघोली (बारामती झटका)

वाघोली ता. माळशिरस या गावात शिवभक्तांच्या व संभाजी ब्रिगेड ग्रामस्थांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपतीच्या जयंतीच्या निमित्ताने दि. १८ तारखेला सकाळी रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच संध्याकाळच्या सत्रात हिप्नॉटिझम संमोहन, अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती, समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती, विद्यार्थी व्यक्तिमत्त्वाचा विकास करणे आदी कार्यक्रम डॉ. दत्तात्रय भोसले यांनी संपन्न केला.

दि. १९ फेब्रुवारी सकाळी ९-०० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास गावातील बहुजन समाजातील जेष्ठ नागरिक यांचेहस्ते अभिषेक करून पुष्पहार घालण्यात आला. सकाळी दहा वाजता शाळेतील विद्यार्थ्यांचे मनोगते व शिवव्याख्याते सुरुडकर सर यांचे व्याख्यान तर दुपारच्या सत्रात अकलूज भुईकोट किल्ल्यावरुन ज्योत आणण्यात आले. तसेच संध्याकाळच्या सत्रात ४.३० ते ६.३० या वेळेत कोविड चे नियम पाळून छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर व्याख्याते प्राध्यापक विक्रम मगर सर यांच्या हस्ते छत्रपतीच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

सदर कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन गावातील कोजागिरी भजनी मंडळातील महिलांच्या व प्रमुख व्याख्याते प्राध्यापक विक्रम मगर सरांच्या हस्ते करून जिजाऊ वंदना घेऊन नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा म्हणण्यात आला व नंतर प्राध्यापक विक्रम मगर सर यांनी छत्रपतींवर विचार मांडले. या कार्यक्रमाची सांगता शिव भोजन व महाप्रसाद घेऊन करण्यात आली. सदर कार्यक्रमास पुणे विभागीय अध्यक्ष उत्तमराव माने, संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष सचिन बापू जगताप, मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष वजीर शेख, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखान्याचे संचालक सतीश बापू शेंडगे, इंजिनीयर बबनराव शेंडगे साहेब, संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक रणजीत चव्हाण, संभाजी ब्रिगेड तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे, शिवश्री माऊली माऊली कचरे, मराठा सेवा संघाचे तालुका सचिव राजेंद्र मिसाळ, जिजाऊ ब्रिगेडच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष शिवश्री मीनाक्षी जगदाळे, व जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ यांनी केले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफळे, भाजीपाला यांचे निर्यातक्षम उत्पादन घेणे काळाची गरज !!
Next articleविहीर न खोदताच पैसे उचलले, शेतकऱ्यांची तक्रार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here