शिवरत्न जिवाजी महाले यांची माळशिरस येथे जयंती उत्साही वातावरणात संपन्न.
माळशिरस ( बारामती झटका )
छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्याची निर्मिती करीत असताना अनेक शिलेदारांनी साथ दिली त्यापैकी विश्वासू शिलेदारामध्ये शूरवीर जिवाजी महाले यांचा स्वराज्य निर्मिती लढ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विश्वासू अंगरक्षक होते. खानाच्या भेटीत होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी अशी म्हण प्रचलित झालेली होती त्यांना शिवरत्न ही पदवी बहाल केलेली होती असे मौलिक विचार माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय आमदार आमदार युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राम सातपुते यांनी माळशिरस येथे शूर वीर जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये बोलताना सांगितले.

शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंती निमित्त माळशिरस येथे लोकप्रिय आमदार राम सातपुते यांच्या हस्ते व अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सोपानकाका नारनवर, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर, माळशिरस तालुका संघटन सरचिटणीस संजय देशमुख, ओबीसी चे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वावरे, माळशिरस तालुका युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष मोटेवाडीचे सरपंच दादासाहेब खरात, बाळासाहेब साळुंखे गोरख क्षीरसागर अतुल सूर्यवंशी संतोष जाधव राजेंद्र काशीद आबा राऊत आदी मान्यवरांसह नाभिक समाज व इतर समाजातील मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng