मुंबई ( बारामती झटका )
खासदार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्यांसाठी आझाद मैदान येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणास माळशिरस तालुका सकल मराठा समाज यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे नेते धैर्यशील मोहिते-पाटील व डॉटर्स मॉम्स फाउंडेशनच्या अध्यक्षा जिल्हा परिषद सदस्या सौ. शितलदेवी मोहिते पाटील यांनी तालुक्याच्यावतीने उपस्थित राहून पाठिंबा दर्शविलेला आहे. त्यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय मागण्यासाठी मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून खासदार श्रीमंत युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले आझाद मैदान येथे उपोषणास बसलेले आहेत. माळशिरस तालुक्याच्या वतीने धैर्यशील मोहिते-पाटील व सौ. शीतलदेवी मोहिते पाटील यांनी तालुक्याच्या वतीने पाठिंबा दिलेला आहे.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात मराठा समाजाचे मुक मोर्चे, मेळावे, बैठका झालेल्या होत्या, त्यावेळी उपस्थित राहून वेळोवेळी सहकार्य केलेले आहे.

आज मुंबई येथे श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराज यांची भेट घेऊन माळशिरस तालुका सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून पाठिंबा दिलेला असल्याने माळशिरस तालुका सकल मराठा समाज बांधवांमध्ये धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng