जयवंत पालवे यांच्या अस्तित्वाची तर तानाजी पालवे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असल्याने तात्या आबा पैकी कोणाला मतदार मामा बनवणार?
मांडवे ( बारामती झटका)
मांडवे ता. माळशिरस या ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 4 मधील एका जागेची पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झालेली आहे. मांडवे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी 17 जागांपैकी दोन्ही पॅनलचे आठ आठ सदस्य निवडून आलेले होते. एका जागेसाठी समान मते पडलेली असल्याने चिठ्ठी काढण्यात आली होती. त्यावेळेस जयवंत पालवे गटाची चिट्ठी निघालेली होती. अशी छाप काट्यावर असणारी मांडवे ग्रामपंचायत पुन्हा न्यायालयाच्या निर्णयाने सदस्यत्व रद्द झाल्याने पुन्हा पोट निवडणुकीत ग्रामपंचायत काट्यावर आल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे.
माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य व मांडवे गावचे माजी सरपंच पदाचा उपभोग घेणारे तानाजी पालवे व जयवंत पालवे पॅनल प्रमुख आहेत. त्यामुळे जयवंत तात्या पालवे यांच्या अस्तित्वाची तर तानाजी आबा पालवे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक बनलेली आहे. आबा तात्या यांच्यापैकी मतदार कोणाला मामा बनवणार याची उत्सुकता माळशिरस तालुक्यातील राजकीय वर्तुळामध्ये लागलेली आहे.
मांडवे गावावर पालवे आडनावाचे वर्चस्व कायम राहिलेले आहे. दोन्हीकडीलही पॅनल प्रमुख पालवे आहेत मात्र, चिठ्ठीवर ग्रामपंचायत सदस्य झालेले हनुमंत टेळे यांनी नाट्यमयरित्या हनुमान उडी घेऊन मांडवे गावचे सरपंच पदावर विराजमान झालेले आहेत. सौ. नागराबाई जयवंत पालवे यांच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालय येथे रिट याचिका दाखल केलेली होती. मेहरबान न्यायालय यांनी ग्रामपंचायत सदस्यपद अपात्र केलेले आहे. त्यामुळे मांडवे ग्रामपंचायतची पोटनिवडणूक लागलेली आहे.
ग्रामपंचायतीचे संख्याबळ काठावर असल्याने सरपंच उपसरपंच पदासाठी अनेक दावेदार असण्याची शक्यता आहे. सरपंच उपसरपंच यांचा कालावधी ठराविक महिन्यासाठी होता. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाने हनुमंत टेळे यांचे सरपंचपद बदलणे जयवंत पालवे यांच्या पार्टीला अडचणीचे ठरलेले आहे. पोटनिवडणुकीत जयवंत पालवे गटाचा सदस्य पराभूत झाला तर पाच वर्षांकरता हनुमंत टेळे यांना संधी मिळू शकते कारण, तानाजी पालवे गटाचे नऊ सदस्य होतील सर्व ग्रामपंचायतीचा फेरबदल करायचा का नाही हे ठरविण्याचे चार नंबर वॉर्डातील मतदारांच्या हातामध्ये आहे त्यामुळे या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागून राहिलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng