वैकुंठवाशी सौ. शालिनी तुकाराम साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन.
महाळुंग ( बारामती झटका )
महाळुंग (पायरीचापुल) येथे वैकुंठवासी सौ. शालिनी तुकाराम साळुंखे यांचे सोमवार दि. 06/12/2021 रोजी प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज, मळोली यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे.

स्व.सौ. शालिनी साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त फुलांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर 11 वाजून 55 मिनिटांनी प्रतिमेवर पुष्पवृष्टी होणार आहे. लगेचच महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन श्री. तुकाराम रामचंद्र साळुंखे, संजय तुकाराम साळुंखे, उदय तुकाराम साळुंखे, सचिन तुकाराम साळुंखे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng