जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या मंदिराचा कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन.

ह.भ.प. हनुमंतराव खुळे थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या तुकाराम महाराज मंदिराचा कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न होणार.

वडापुरी ( बारामती झटका )

वडापुरी ता. इंदापूर येथील ह.भ.प‌. स्वर्गीय हनुमंतराव खुळे थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या मंदिरामध्ये कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा शनिवार दि. 16/04/2022 रोजी तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब देहूकर मोरे महाराज, मळोली यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी सात वाजल्यापासून होणार आहे. कलशारोहन व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपल्यानंतर ह.भ.प. बापूसाहेब देहूकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी कलशारोहण प्राणप्रतिष्ठा किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. मित्रपरिवार, नातेवाईक यांनी सहकुटुंब कार्यक्रमास येऊन शोभा वाढवून सहभाग नोंदवावा, अशी मळोली, शेंडेचिंच, वडापुरी समस्त खुळे – थोरात परिवारांच्या वतीने विनंती आहे.


बाजीराव खुळे थोरात यांचे वडील, आजोबा यांचे मूळ गाव मळोली, ता. माळशिरस आहे. सध्या उद्योग व्यवसायानिमित्त वडापुरी ता. इंदापूर येथे वास्तव्यास आहेत. बाजीराव खुळे थोरात यांना जनार्दन, गोवर्धन, तुकाराम, नारायण आणि हनुमंत अशी पाच मुले आहे. जनार्धन यांना चार मुले, गोवर्धन यांना तीन मुले, तुकाराम यांना चार मुले, नारायण यांना तीन मुले तर हनुमंत यांना तीन मुली असा परिवार आहे.
खुळे थोरात परिवार अध्यात्मिक आहे. बाजीराव यांचे दुःखद निधन झाल्यानंतरही अध्यात्माचे काम सुरूच आहे. सर्व घराणे माळकरी आहेत. आजही सर्वांच्या गळ्यात चार-पाच पिढ्या पवित्र तुळशीच्या माळा आहेत.


हनुमंतराव खुळे थोरात यांचे शिक्षण बीएससी ऍग्री झालेले होते. त्यांनी कृषी विभागामध्ये कृषी पर्यवेक्षक पदावर काम केले होते. अनेक जिल्ह्यांमध्ये व तालुक्यात काम केलेले आहे. विशेष करून बारामती तालुक्यातील पणदरे या मंडलला काम करीत असताना बारा वाड्या आजही हनुमंतराव खुळे थोरात यांना मळोलीकर या नावाने ओळखतात. हनुमंतराव यांना तात्या या टोपण नावाने ओळखले जाते. तात्यांचा विवाह दिघी येथील निंबाळकर घराण्यातील कमल यांच्याशी झालेला होता. त्यांना जयश्री, उमा, जयंती अशा तीन कन्या आहेत. तात्यांनी उत्कृष्ट नोकरी करीत असताना त्यांना अध्यात्माचा अभ्यास असल्याने कीर्तन सेवा सुद्धा करीत असत. तात्यांच्या अध्यात्मिक जडणघडणीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन समाजामध्ये वागत असत. कधीही तात्यांनी स्वार्थ पाहिलेला नाही, फक्त परमार्थ केला. तात्यांच्या मनामध्ये संकल्पना होती‌. आपल्या घरासमोर तुकाराम महाराज यांचे मंदिर असावे, त्यांनी मंदिर उभारणीस सुरुवात केली होती‌‌. मंदिराचा स्लॅप पडलेला होता. अशावेळी तात्यांचे दुःखद निधन झालेले होते. पतीच्या निधनानंतर कमल यांना दुःखाच्या आघातामधून सावरण्यासाठी बराच अवधी गेला. त्यांनी आपल्या पतीचे अर्धवट राहिलेले तुकाराम महाराज मंदिराचे स्वप्न पूर्ण केले. स्वप्नपूर्ती तुकाराम महाराज कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम हनुमान जयंती दिवशी घेतलेला आहे‌ विशेष म्हणजे तात्यांचा जन्म हनुमान जयंतीचा आहे. ह.भ.प. स्वर्गीय हनुमंतराव बाजीराव खुळे थोरात यांच्या संकल्पनेतील स्वप्नपूर्तीच्या तुकाराम महाराज यांच्या कलशारोहन, प्राणप्रतिष्ठा किर्तन व महाप्रसाद कार्यक्रमास सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मळोली, शेंडेचिंच, ता. माळशिरस व वडापुरी ता. इंदापूर समस्त खुळे आणि थोरात परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.


नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंतीनिमित्त आ. राम सातपुते यांचा झंझावाती दौरा.
Next articleकट्टर भीमसैनिक शिवाजीभाऊ यांनी भीमरायाच्या जन्म दिनादिवशी केला गृहप्रवेश व वास्तुशांती समारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here